FACT CHECK : वर्ल्ड कपमध्ये गंभीरनं केला भाजपचा प्रचार? काय आहे सत्य

FACT CHECK : वर्ल्ड कपमध्ये गंभीरनं केला भाजपचा प्रचार? काय आहे सत्य

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये गंभीर भगव्या रंगाची पगडी आणि गळ्यात भाजपचा पटका घालून उभा आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सध्या चर्चा होत आहे ती गौतम गंभीरच्या एका फोटोची. वर्ल्ड कपचे समालोचन करणाऱ्या गौतम गंभीरच्या एका फोटोनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये गंभीर भगव्या रंगाची पगडी आणि गळ्यात भाजपचा पटका घालून उभा आहे. हा फोटो सगळ्यात आधी स्टॅंडअप कॅमेडियन कुणाल कामरा यांन 6 जुलै रोजी ट्विटरवर शेअर केला होता. यात गंभीरसोबत भारताचा माजी गोलंदाजी इरफान पठाण आणि समालोचक जतिन सप्रुही आहेत. या फोटोवरून गंभीरला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

गंभीरच्या या फोटोवर चाहत्यांनी, क्रिकेटचा वापर भाजपच्या प्रचारासाठी करत आहे हे निंदनीय आहे, अशा शब्दात चाहते टिका करत आहेत. कुणाल कामरा यानं, "भाजपचा खासदार संसदेत गंभीर काम करताना' असे कॅप्शन लिहिले होते.

हाच फोटो तृणमूल कॉंग्रेसच्या महुआ मोईत्रा यांनी शेअर केला होता. महुआ यांनी, "ही लाजीरवाणी बाब आहे. खासदार म्हणून आपले काम न करता देशवासियांच्या भावनांशी खेळत आहेत", असे ट्वीट केले होते.

हा फोटो फेक

सोशल मीडियावर व्हायरल होत असेलला फोटो मात्र खोटा असल्याचे समोर आले आहे. इरफान पठाणनं टाकलेल्या फोटोमध्ये गंभीरनं भगवी पगडी किंवा भाजपचा प्रचार केलेला नाही. या फोटोची छेडछाडकरून गंभीरला पगडी आणि गळ्यात भाजपच्या पटका घालण्यात आला होता.

दरम्यान हा फोटो फेक असल्याचे समजल्यानंतर कुणाल कामरानं एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, "मी मस्करी करत असल्याचे मत व्यक्त केले होते".

SPECIAL REPORT: वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियात फूट?

First published: July 14, 2019, 5:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading