World Cup Point Table: पाकिस्तानच्या आशा मावळल्या, तर बांगलादेश जायंट किलर

World Cup Point Table: पाकिस्तानच्या आशा मावळल्या, तर बांगलादेश जायंट किलर

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघानं केवळ एक सामना जिंकला आहे.

  • Share this:

लंडन, 18 जून : ICC Cricket World Cup 2019 सुरु होऊन आता दोन आठवडे झाले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रॉबीन राऊंड पध्दतीचा वापर होत असल्यामुळं प्रत्येक संघाचे 9 सामने होणार आहेत. यानंतर गुणातालिकेत पहिल्या चार क्रमांकावर असलेले संघ सेमीफायनल गाठतील. त्यामुळं आता सेमीफायन गाठणार ते चार संघ कोणते असतील, याचे तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या संघांनी 5 सामने खेळले आहेत. तर, न्यूझीलंड, भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान यांनी 4 सामने खेळले आहेत. गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ 8 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर, भारताचा संघ 7 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड 6 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा संघ सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.

दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या वर्ल्ड कपमधल्या आशा आता मावळल्या आहेत. पाकिस्तान संघानं आतापर्यंत केवळ एक सामना जिंकला आहे. तर, अफगाणिस्ताननं एकही सामना जिंकलेला नाही. पाकिस्तानचे आता केवळ 4 सामने उरले आहेत. आपलं आव्हान टिकवण्यासाठी त्यांना सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

या चार संघांना मिळणार सेमीफायनलचं तिकीट

ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ गुणतालिकेत सध्या पहिल्या चार क्रमांकात आहेत. त्यामुळं या चार संघांना सेमीफायनले तिकीट मिळू शकते.

भारताचा प्रवास सोपा

भारतानं आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यातील एक सामना पावसामुळं रद्द झाला त्यामुळं भारताकडे आता 7 गुण आहेत. भारताचे पुढील सामने हे बांगलादेश, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधात होणार आहे. यातील इंग्लंड विरुद्धचा सामना भारतासाठी कठिण असेल. त्यामुळं भारतानं बाकीचे सामने जिंकल्यास ते थेट सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो.

वाचा- सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही'

वाचा-World Cup : इंग्लंडची चिंता वाढली, ऐन वर्ल्ड कपमध्ये बदलावा लागणार कर्णधार

वाचा- World Cup : ठरलं ! 'या' चार संघांना मिळणार सेमीफायनलचे तिकीट

लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading