World Cup : सेमीफायनलमध्ये भारत कोणाशी भिडणार? दोन पैकी एक संघ देणार टक्कर

ICC Cricket World Cup सेमीफायनलला तीन संघ पोहचले असून साखळी फेरीत उर्वरित सामन्यात कोणीही जिंकलं किंवा पराभूत झालं तरी इंग्लंड तिसऱ्या स्थानीच राहणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 08:11 PM IST

World Cup : सेमीफायनलमध्ये भारत कोणाशी भिडणार? दोन पैकी एक संघ देणार टक्कर

बर्मिंगहम, 04 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारतानं बांगलादेशला पराभूत करून सेमीफायनलला प्रवेश केला. याआधी ऑस्ट्रेलियानं सेमीफायनलमध्ये स्थान पक्कं केलं आहे. गुणतक्त्त्यात ऑस्ट्रेलिया 14 गुणांसह पहिल्या स्थानावर तर भारत 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर तिसऱ्या स्थानी इंग्लंड आणि चौथ्या स्थानी न्यूझीलंड आहे. या दोन्ही संघाचे स्थान जवळपास निश्चित आहे. यात पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानला अविश्विसनीय कामगिरी करून विजय मिळवावा लागेल तरच ते चौथ्या क्रमांकावर पोहचू शकतील. त्यांच्यापुढे असणारे आव्हान पाहता ही शक्यता कमी आहे.

सेमीफायनलमध्ये गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना चौथ्या क्रमांकावरील संघाशी होतो. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये दुसरी सेमीफायनलची लढत होईल. सध्या गुणतक्त्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांचा एक सामना शिल्लक आहे. यात दोन्ही संघ जिंकले किंवा पराभूत झाले तरी ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानीच राहतील. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये आमने-सामने येणार नाहीत.

World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला करावा लागेल हा चमत्कार!

भारत पहिल्या क्रमांकावर राहिला तर चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंडचे आव्हान भारतासमोर असेल. न्यूझीलंडविरुद्ध भारताची लढत होण्याची शक्यता आहे. भारताने शेवटचा सामना जिंकला तर भारताचे 15 गुण होतील. मात्र ऑस्ट्रेलिया पराभूत झाली तर त्यांचे 14 गुण राहतील. यामुळे भारत पहिल्या स्थानावर राहिल आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडशी पहिल्या क्रमांकावरील भारताशी होईल.

Loading...

सेमीफायनलमध्ये भारताची लढत इंग्लंडशी होण्याची शक्यता आहे. भारताचा पुढचा सामना लंकेशी आहे. यात भारत विजयी झाल्यास 15 गुण होतील. तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यास त्यांचे 16 गुण होतील. यात भारत दुसऱ्या स्थानावर राहिल. यामुळे तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी सेमीफायनलची लढत होईल. सध्या इंग्लंड तिसऱ्या स्थानावर असून त्यांचे सर्व सामने झाले आहेत. साखळी फेरीतील उर्वरीत लढतीत कोणताही संघ जिंकला किंवा पराभूत झाला तरी इंग्लंडचे स्थान बदलणार नाही. त्यांचे 12 गुण झाले असून चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडचे 11 गुण झाले आहेत. या दोन्ही संघांचे सर्व सामने झाले आहेत.

मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

गुणतक्त्यात पाचव्या स्थानी असलेल्या पाकिस्तानला शेवटच्या सामन्यात विजयासह 11 गुण मिळवता येतील. मात्र, सेमीफायनलला स्थान पटकावणं कठीण आहे. यासाठी मोठ्या फरकाने त्यांना सामना जिंकणं गरजेचं आहे. बांगलादेशची वर्ल्ड कपमधील कामगिरी पाहता ते सहजासहजी सामना गमावणार नाहीत. त्यामुळं चौथ्या स्थानी न्यूझीलंडच राहिल. पाकिस्तानने बाजी मारली तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाशी त्यांचा सामना होईल. त्यांचा सामना भारत किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल. भारत दुसऱ्या स्थानी राहिला तर मात्र भारत-पाक सामना होण्याची शक्यता नाही.

वर्ल्ड कपची बाद फेरी 9 जुलैला सुरू होणार आहे. पहिली सेमीफायनल 9 जुलैला मँचेस्टरवर होईल. त्यानंतर दुसरा सामना 11 जुलैला होणार आहे. तर अंतिम सामना लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.

SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...