World Cup : सामना जिंकूनही टीम इंडियाला फटका, गुणतालिकेत 'हा' संघ पहिल्या क्रमांकावर

World Cup : सामना जिंकूनही टीम इंडियाला फटका, गुणतालिकेत 'हा' संघ पहिल्या क्रमांकावर

राऊंड रॉबीन पध्दतीचा काही संघाना फायदा होईल तर, काही संघांना तोटा होणार आहे.

  • Share this:

लंडन, 06 जून : वर्ल्ड कप सुरु होऊन एक आठवड्यांचा कालावधी होऊन गेला आहे. दरम्यान सध्या सर्वच संघाचे एक-एक सामने झाले आहेत, त्यामुळे आता स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. राऊंड रॉबीन नियमांनुसार प्रत्येक संघाला सर्व प्रतिस्पर्धा संघांशी सामना करावा लागणार आहेत. तसेच गुणतालिकेत जे संघ पहिल्या चारमध्ये असतील ते, सेमीफायनल गाठतील. सध्या पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे. न्यूझीलंड बुधवारी बांगलादेश विरोधात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अगदी दोन विकेटनं सामना जिंकला. सध्या 4 गुणांसह न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे.

राऊंड रॉबीन पध्दतीचा काही संघाना फायदा होईल तर, काही संघांना तोटा होणार आहे. या पध्दतीचा भारतीय संघाला फटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या पहिल्या सामन्यात विराटसेनेनं विजयी सलामी दिली. या सामन्यात रोहितनं शतकी खेळी करत पहिला विजय नोंदवला. भारतानं 47 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं दिलेले 227 धावांचे आव्हान पार केले. मात्र, भारतानं शेवटच्या काही ओव्हरमध्ये धिम्या गतीनं धावा केल्या त्यामुळं भारताचा रनरेट खालावला आहे. 2 गुणांसह भारत पाचव्या स्थानावर आहे. भारताचा रनरेट 0.302 आहे. तर, 2 गुणांसह वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे.बुधवारी न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाने आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. लंडनमध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशवर 2 गडी राखून मात केली. 245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून रॉस टेलरने 82 धावांची खेळी केली, त्याला कर्णधार केन विल्यमसननेही चांगली साथ दिली.

वाचा- World Cup : भारताच्या ‘या’ शिलेदारांनी फेरले दक्षिण आफ्रिकेच्या आशांवर पाणी

वाचा- VIDEO : फक्त 120 सेकंदात पाहा कशी केली रोहितनं आफ्रिकन सफाई !

वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 12:10 PM IST

ताज्या बातम्या