PAKvsAFG : पाकिस्तानला अफगाणिस्तानने दिलं 228 धावांचं आव्हान

PAKvsAFG : पाकिस्तानला अफगाणिस्तानने दिलं 228 धावांचं आव्हान

ICC Cricket World Cup शाहिन आफ्रिदीच्या माऱ्यासमोर अफगाणिस्तानची घसरगुंडी उडाली. या सामन्यात पाकिस्तानला विजय गरजेचा आहे.

  • Share this:

लीड्स, 29 जून : ICC Cricket World Cup मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानला 50 षटकात -- धावा करता आल्या. कर्णधार गुलबदीन नैब, हशमतुल्लाह शाहिदी, इकराम अली खिल यांना फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. मात्र, रहमत शाह, असगर अफगाण आणि नजीबुल्लाह झारदन यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे अफगाणिस्तानला आव्हानात्मक धावसंख्या उभा करता आली. रहमत शाहने 35 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानच्या 3 बाद 57 धावा झाल्या होत्या. त्यानंतर असगर अफगाणने संघाचा डाव सावरला. त्याने 35 चेंडूत 42 धावा केल्या. त्यानंतर नजीबुल्लाह झारदनने 54 चेंडूत 42 धावा करत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक 4 तर इमाद वसिम, वहाब रियाजने प्रत्येकी 2 आणि शादाब खानने 1 गडी बाद केला.

अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानला विजय गरजेचा आहे. पाक जिंकले तरच त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. सध्या पाकिस्तान चांगल्या लयीत असून त्यांनी सलग दोन विजय मिळवले आहेत. तर अफगाणिस्तानला एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. अफगाणिस्तानच्या संघाने स्पर्धेत एकही विजय मिळवला नसला तरी त्यांनी बलाढ्य संघांनासुद्धा झुंजवलं आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी त्यांच्याविरुद्ध पराभवाने पाकची वाट बिकट होऊ शकते.

World Cup : पंतला संधी नाहीच! धोनी आणि शंकरबद्दल काय म्हणाला विराट?

World Cup : शोएब अख्तरचा भारतावर गंभीर आरोप!

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 06:39 PM IST

ताज्या बातम्या