World Cup : 'या' दिग्गज पाकिस्तानी खेळाडूची भारताला ऑफर, '2 आठवड्यात पांड्याला करतो चॅम्पियन'

World Cup : 'या' दिग्गज पाकिस्तानी खेळाडूची भारताला ऑफर, '2 आठवड्यात पांड्याला करतो चॅम्पियन'

वेस्ट इंडिज विरोधात हार्दिक पांड्यानं 46 धावांची आक्रमक खेळी केली होती, त्याचबरोबर महत्त्वाची एक विकेटही घेतली.

  • Share this:

लंडन, 28 जून : ICC Cricket World Cupमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ वर्ल्ड कपमधला एकमेव अपराजित संघ आहे. भारतानं आतापर्यंत पाचही सामने जिंकले आहेत. कारण सध्या भारतीय संघातील सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मॅंचेस्टरमध्ये शुक्रवारी (27 जून) वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यात भारताची आघाडीची फळी कमकुवत ठरली असली तरी हार्दिक पांड्या आणि धोनी यांनी सहाव्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी करत भारताचा डाव सांभाळला. मात्र पाकिस्तानचा एक दिग्गज खेळाडू पांड्याच्या या खेळीवर नाखूश आहे.

यामुळेच पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू अब्दुल रज्जाक यानं बीसीसीआयकडे एक काम मागितले आहे. ते म्हणजे हार्दिक पांड्याला क्रिकेट शिकवायचे. पाकिस्तान पत्रकार साज सादिक याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रज्जाकनं, "मला फक्त दोन आठवडे द्या, मी त्याला जगातला सर्वात चांगला ऑल राऊंडर बनवतो", असे सांगितले आहे. तसेच रज्जाकनं, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या सामन्यात पहिल्यांदा खेळताना पाहिले. त्यावेळी रज्जाकनं "पांड्याच्या खेळीत सुधारणेची गरज आहे", असे मत त्याने व्यक्त केले.

तसेच, "जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा त्याची फुट मुव्हमेंट आणि पायाची गती चूकीची आहे. मला फक्त दोन आठवडे द्या, मी त्याला जगातला सर्वात मोठा ऑलराऊंडर बनवतो", अशी ऑफर भारतीय संघाला दिली आहे.

वेस्ट इंडिज विरोधात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 269 धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ फक्त 143 धावा करू शकला. भारताने या विजयासह आपली सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे. वेस्ट इंडीज फलंदाजीला उतरताच मोहम्मद शमीने पहिला दणका दिला. शमीने दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्यानंतर पांड्याने अॅम्ब्रिसला आणि कुलदीप यादवने निकोलस पूरनला बाद केलं. चहलने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. बुमराहने ब्रेथवेट आणि अॅलनला सलग दोन चेंडूवर बाद केले. त्यानंतर शमीने आणि चहलने एक विकेट घेत विंडीजचा डाव संपुष्टात आणला. तत्पूर्वी, सामन्यात भारतानं प्रथम टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यात विराट कोहलीने 72 धावांची तर, धोनीनं अर्धशतकी खेळी केली. मात्र आघाडीच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाला. भारतीय संघाची भिस्त विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यावर असतानाच राहुल 48 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याच्या 46 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 268 धावांपर्यंत मजल मारली.

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

First published: June 28, 2019, 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading