कराची, 26 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ अपराजित संघ आहे, त्यामुळं विराट सेनेचे सेमिफायनलमधले स्थान जवळजवळ निश्वित झाले आहे. भारतानं 5 सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला. गुरुवारी भारत वेस्ट-इंडिज विरोधात खेळणार आहे. त्यानंतर भारताचे श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंड यांच्याविरोधात सामने होणार आहे. मात्र, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासिक अली यानं एक धक्कादायक विधान केले आहे.
पाकिस्तानचा संघ सध्या वर्ल्ड कपमध्ये करो या मरो अशा परिस्थितीत आहे. मात्र, भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर त्यांनी चांगला कमबॅक केला. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आज न्यूझीलंड विरोधातही ते चांगली कामगिरी करत आहे. असे असले तरी, त्यांचे सेमिफायनलमध्ये पोहचणे हे इतर संघांवर अवलंबून आहे. यातच बासिक अली यानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान सेमिफायनलमध्ये जाऊ नये म्हणून भारत मुद्दाम श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याविरोधात सामना गमावेल, असे धक्कादायक विधान केले आहे.
बसील अलीनं या वृत्तावाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, "ऑस्ट्रेलियाही मुद्दाम भारताविरुद्ध सामना हरला. एवढेच नाही तर, 1992च्या वर्ल्ड कपमध्येही न्यूझीलंडचा संघ जाणून बुजून सेमिफायनलमध्ये पाकिस्तान विरोधात हरला होता". बसील अलीच्या या खळबळजनक विधानामुळं सर्वचं हैरान झाले आहेत.
Basit Ali reckons India will not want Pakistan to qualify for the semi-finals and may play poorly in their matches against Sri Lanka and Bangladesh 🙄 #CWC19 pic.twitter.com/vwg3oFnnpl
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) June 26, 2019
पाकिस्तानला हवी भारताची साथ
ICC Cricket World Cupमध्ये पाकिस्तानला सेमिफायनलमध्ये पोहचण्यासाठी न्यूझीलंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याविरोधात सामने जिंकावे लागणार आहेत. तसेच, भारताच्या सामन्यांवरही त्यांची नजर असेल. भारताला श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्याविरोधात खेळायचे आहेत. जर, भारत इंग्लंड किंवा बांगलादेश यांच्याविरोधात सामन्यात पराभूत झाली तर, पाकिस्तानचा संघाचे सेमीफायनलचे स्वप्न धुळीस मिळेल. त्यामुळं पाकिस्तान चाहते आता भारतीय संघ सर्व सामने जिंकू देत अशी प्रार्थना करतील.
वाचा- IND vs WI : अरे चाललयं काय, भारत वेस्ट इंडिज विरोधात खेळतचं नाहीये तर...
वाचा- सचिनला भारतीय संघात नको आहे शमी, हॅट्ट्रिक करूनही नाकारण्याचे 'हे' आहे कारण
वाचा- फलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या बुमराहच्या यॉर्कर मागचं 'हे' आहे रहस्य
अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी