PAK vs NZ : न्यूझीलंडनं पाकला दिले 238 धावांचे आव्हान, जेम्स निशामनं गाजवले मैदान

न्यूझीलंड विरोधातला हा सामना पाकिस्तान संघासाठी महत्त्वाचा आहे, सेमिफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी पाक संघाला हा सामना जिंकावा लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 07:52 PM IST

PAK vs NZ : न्यूझीलंडनं पाकला दिले 238 धावांचे आव्हान, जेम्स निशामनं गाजवले मैदान

बर्मिंगहम, 26 जून: ICC Cricket world Cupमध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. त्यामुळं न्यूझीलंडनं पाकिस्तानसमोर 238 धावांचे आव्हान ठेवले आहे. न्यूझीलंडनं टॉस जिंकत घेतलेला फलंदाजीचा निर्णय त्यांनाच महागात पडला. न्यूझीलंडकडून शेवटच्या षटकात चांगली फलंदाजी केली. कॉलिन ग्रैंडहोम आणि निशाम यांनी चांगली फलंदाजी केली, या दोघांनी शतकी भागिदारी केली. निशामच्या 97 धावांच्या खेळीमुळं न्यूझीलंडनं 200चा आकडा पार केला. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकनं न्यूझीलंडला 14 धावा दिल्या. मात्र पाकच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व ठेवले. चांगली फलंदाजी करून कॉलिन ग्रैंडहोम 71 चेंडूत 64 धावा करत धावबाद झाला. त्यामुळं न्यूझीलंडला 237 धावांपर्यंत मजल मारता आली.

पाककडून शाहिन आफ्रिदीने 10 ओव्हरमध्ये 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्यानं केवळ 2.80च्या सरासरीनं धावा दिल्या. पाकच्या गोलंदाजांनी किवींच्या फलंदाजांवर वर्चस्व कायम राखत त्यांना आक्रमक फलंदाजी करू दिली नाही. दुसऱ्याच ओव्हरला मोहम्मह आमिरनं न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज मार्टिन गुपतीलला बाद केले. आमिरच्या गोलंदाजीवर फटका खेळताना चेंडू बॅटला लागून बेल्सवर आदळला आणि गुपतील केवळ 5 धावांवर माघारी परतला. त्या पाठोपाठ कॉलिन मुनरोदेखील 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर हे दोन 2 अनुभवी खेळाडू डाव सांभाळतील अशी आशा न्यूझीलंडला होती. पण तेव्हाच रॉस टेलरच्या उत्कृष्ट झेल टिपत सर्फराजने टेलरला तंबूत धाडले. 9व्या षटकात शाहिन आफ्रिदीने आऊट स्विंग होणारा चेंडू टाकला. त्या चेंडूला दिशा देण्याच्या उद्देशाने टेलरने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि विकेटकिपर सर्फराजनं स्लिपच्या दिशेने चपळाईने उडी मारत कॅच पकडला. गेल्या काही सामन्यात टेलर आणि केन विल्यम्सन यांची जोडी कमाल करत आहे, त्यामुळं आफ्रिदीनं पाकला मोठे यश मिळवून दिले.

4 सामन्यात 373 धावा करणाऱ्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने 41 धावांची खेळी केली. पाककडून मोहम्मद आमिरनं आणि शादाब खाननं यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.

हेड-टू-हेड

दोन्ही संघांनी आतापर्यंत 106 एकदिवसीय सामने खेळले आहे. यातील पाकनं 54 तर, न्यूझीलंडनं 48 सामने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला आहे.

वाचा- IND vs WI : अरे चाललयं काय, भारत वेस्ट इंडिज विरोधात खेळतचं नाहीये तर...

वाचा- इंग्लंडच्या पराभवाने तीन संघांना दिलासा, कोण गाठणार सेमीफायनल?

वाचा- World Cup : इंग्लंडचा पराभवाने पाकचा फायदा, दुसऱ्यांदा जग्गजेते होणार?

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 02:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close