Aus vs Pak : पाकिस्तान विजयी लय राखण्यास सज्ज, पण 'हा' एक निर्णय भोवणार

Aus vs Pak : पाकिस्तान विजयी लय राखण्यास सज्ज, पण 'हा' एक निर्णय भोवणार

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या 14 पैकी केवळ एका सामन्यात विजयी ठरला.

  • Share this:

टॉन्टन, 12 जून : ICC Cricket World Cupमध्ये पावसामुळं संघाचे मनोबल खालावले आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्याच सामना होणार की नाही, अशी परिस्थिती असताना सामना सुरु झाला. या सामन्यात पाकिस्ताननं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. याआधी इंग्लंडनं यजमानांना नमवून इतर संघांमध्ये धडकी भरवली. त्यामुळं आता जगज्जेत्यांना नमवून विजयी लय कायम राखण्यासाठी पाकचा इरादा असून भारताकडून पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियापुढे विजयी पथावर परतण्याचे आव्हान असेल.

अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध विजय नोंदविणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने धूळ चारली. त्यामुळं पाकिस्तान विरोधात त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तर, पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत घेतलेला गोलंदाजीचा निर्णय त्यांना महागात पडू शकतो. कारण ऑस्ट्रेलियाकडे आक्रमक फलंदाज असले तरी, पाकिस्तानकडे आक्रमक फलंदाज नाहीत. तसेच, मिशले स्टार्क, नाथन-नाईल आणि क्युमिन्स यांच्यासारखे गोलंदाज असल्यामुळं पाकिस्तानला ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दमछाक होऊ शकते.

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या 14 पैकी केवळ एका सामन्यात विजयी ठरला. या धर्तीवर कर्णधार सर्फराज अहमद याने ऑस्ट्रेलयाविरुद्ध विजयासाठी इंग्लंडवरील विजय प्रेरणास्पद ठरू शकतो.

पाकिस्तानचा संघ उतरला काळ्या फिती बांधून मैदानात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ हाताला काळ्या फितीबांधून उतरला. दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अख्तर सर्फराज आणि पाकिस्तानचे कसोटी पंच रिआझुद्दीन यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी पाकिस्तानच्या संघानं काळ्या फिती हाताला बांधल्या आहेत.

वाचा-वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का

वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा

वाचा- World Cup : पाकच्या कर्णधाराने केली भारतीय चाहत्यांवर टीका

SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?

First published: June 12, 2019, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading