World Cup : 'सनम'कडून मार खाल्लेला गुलबदीन पाकला बुडवणार का?

ICC Cricket World Cup उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी पाकिस्तानला अफगाणिस्तानवर विजय आवश्यक आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 01:20 PM IST

World Cup : 'सनम'कडून मार खाल्लेला गुलबदीन पाकला बुडवणार का?

लीडस्, 29 जून : ICC Cricket World Cup मध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शनिवारी सामना होत आहे. यात पाकिस्तानला विजय गरजेचा आहे. पाक जिंकले तरच त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. सध्या पाकिस्तान चांगल्या लयीत असून त्यांनी सलग दोन विजय मिळवले आहेत. तर अफगाणिस्तानला एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.

अफगाणिस्तानच्या संघाने स्पर्धेत एकही विजय मिळवला नसला तरी त्यांनी बलाढ्य संघांनासुद्धा झुंजवलं आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी त्यांच्याविरुद्ध पराभवाने पाकची वाट बिकट होऊ शकते. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबनं याआधी बांगलादेशच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत वेगळ्याच अंदाजात बांगलादेशला इशारा दिला होता. आमचे आव्हान संपुष्टात आलं आहे आता तुमचेही आव्हान संपेल असं सांगत त्यांने सामना आम्ही जिंकू असं म्हटलं होतं. पण त्या सामन्यात बांगलादेशनं बाजी मारली.

अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीनने बांगलादेशला इशारा देण्यासाठी हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डुबेंगे या ओळींचा वापर केला होता. आता शनिवारच्या सामन्यात विजय मिळवून बांगलादेशला नाही तर पाकला बुडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अफगाणिस्तान जिंकल्यास पाकच्या पुढच्या फेरीत जाण्याच्या आशा संपुष्टात येतील.

इंग्लंडच्या पराभवावर पाकचा डोळा

इंग्लंडचा जर पुढच्या सामन्यात पराभव झाला तर पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये प्रवेशाची शक्यता आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला 6 गडी राखून पराभूत केलं. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बाबर आझमचे शतक आणि शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने विजय मिळवला. पाकिस्तानने अफगाणिस्तान आणि बांगलादेशला पराभूत केल्यास त्यांना उपांत्य फेरी गाठता येऊ शकते. गेल्या सामन्यात पाकने संघात बदल केला होता. शोएब मलिकच्या जागी हॅरिस सोहेलला संघात घेतलं आहे.

Loading...

पाहा 'मेन इन ब्ल्यू' कसे दिसतात भगव्या रंगात, PHOTO VIRAL

World Cup Point Table : लंकेच्या पराभवाने तीन संघांमध्ये चुरस!

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 01:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...