World Cup : वर्ल्ड कपमध्ये पाक संघ सर्वात ढिसाळ, टीम इंडिया जगात भारी !

पाकिस्तानने भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत जोरदार कमबॅक केलं आहे. लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 01:06 PM IST

World Cup : वर्ल्ड कपमध्ये पाक संघ सर्वात ढिसाळ, टीम इंडिया जगात भारी !

लंडन, 24 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या सेमीफायनलमध्ये आपले स्थामन पक्के करण्यासाठी सर्व संघांमध्ये चढाओढ सुरु आहे. यातच पाकिस्तानी संघानं दक्षिण आफ्रिकेला नमवत, आपल्या सेमीफायनलच्या आशा कायम राखल्या आहेत. पाकिस्तानी संघानं फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी करत, हा विजय मिळवला. तर, दुसरीकडे या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं उभ्या केलेल्या 308 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 259 धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयानंतर चाहत्यांनी अवहेलना सहन करणाऱ्या पाक संघाचे कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे. असे असले तरी, पाकिस्तान संघाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा मुद्दा अजूनही कायम आहे. पहिल्या सामन्यापासून पाकच्या क्षेत्ररक्षणात कोणतीही सुधारणा झालेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या सामन्यातही पाकिस्तानच्या खेळाडूंनी सलग दोन चेंडूंवर दोन झेल सोडले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावरचे मीम्स व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान संघाने असा एक 'पराक्रम' केला, ज्यात भारतीय संघ तळाला आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी संघाने सर्वाधिक झेल सोडण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी 26 पैकी 14 झेल सोडले आहेत. सर्वाधिक झेल सोडणाऱ्या संघांमध्ये पाकिस्तानने अव्वल स्थानावर आहे. तर, याच विक्रमात भारतीय संघ तळाला आहे. भारतीय खेळाडूंनी 15 पैकी केवळ एकच झेल सोडला आहे. या यादीत यजमान इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, पाकिस्तानने भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत जोरदार कमबॅक केलं आहे. लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पाकचे 6 सामन्यात 5 गुण झाले आहेत. जर पाकिस्तानने पुढचे तीनही सामने जिंकले तर त्यांना सेमिफायनलला जागा मिळू शकते. पाकिस्तानने उर्वरित सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे 11 गुण होतील. पाकिस्तानच्या वर लंकेचा संघ असून ते एका सामन्यात जरी पराभूत झाले आणि इतर सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे 10 गुण होतील. तर बांगलादेशसुद्धा एका सामन्यात पराभतू झाल्यास त्यांनाही 10 गुण मिळवता येतील. या दोन्ही संघांना भारताशी लढायचे आहे. त्यात विजय मिळवणं लंकेला आणि बांगलादेशला कठीण आहे.

Loading...

बांगलादेश आणि लंकेच्या पराभवाशिवाय यजमान इंग्लंडच्या जय पराजयावर पाकिस्तानची पुढची वाटचाल ठरणार आहे. सध्या इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे तीन सामने उरले आहेत. यातील दोन सामन्यात इंग्लंडचा पराभव झाल्यास पाचव्या क्रमांकावरील संघ सेमीफायनलला जागा पक्की करू शकतो. इंग्लंडसाठी पुढचे तीनही सामने महत्त्वाचे आहेत. त्यांची गाठ ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंडशी पडणार आहे. यात भारत आणि न्यूझीलंड हे स्पर्धेतील अपराजित संघ आहेत. त्यामुळे या संघाविरुद्ध इंग्लंडची कामगिरी कशी होते यावर स्पर्धेत कोण राहणार आणि बाहेर कोण पडणार हे समजेल.

विदर्भातील नेता बसणार विरोधी पक्षनेतेपदी? या आणि इतर 18 टॉप न्यूज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 01:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...