VIDEO : World Cup मधून बाहेर पडलेल्या पाकचा संघ मायदेशी, पाहा कसं झालं स्वागत!

ICC Cricket World Cup मध्ये भारताविरुद्धच्या पराभवानंतर चाहत्यांची धास्ती घेतलेल्या सर्फराजने मी एकटा घरी जाणार नाही असं म्हटलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 09:01 PM IST

VIDEO : World Cup मधून बाहेर पडलेल्या पाकचा संघ मायदेशी, पाहा कसं झालं स्वागत!

इस्लामाबाद, 07 जुलै : ICC Cricket World Cup पाकिस्तानचे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघ रविवारी मायदेशी परतला. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्याच्यावर अपशब्दांत टीका करताना चाहत्यांनी खालची पातळी गाठली होती. या पराभवानंतर सर्फराजने सहकाऱ्यांना म्हटलं होतं की देशाच्या जनतेला आपण सर्वांनी एकत्रित सामोरं जायचं. मी एकटा घरी जाणार नाही. त्यानंतर जेव्हा रविवारी पाकचा संघ विमानतळावर पोहचला तेव्हा तिथं सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. चाहते राग काढतील यासाठी खबरदारी घेण्यात आली होती.

पाकिस्तानचा संघ विमानतळावर पोहचताच चाहत्यांनी केलेलं स्वागत खेळाडूंसाठी अनपेक्षित असंच होतं. कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन न करता संघाचं चांगल्या पद्धतीने स्वागत झालं. सोशल मिडियावर ज्यापद्घतीने राग काढण्यात आला तसं काहीच यावेळी दिसलं नाही. पाकिस्तानने 9 पैकी 5 सामने जिंकून 11 गुण मिळवले. न्यूझीलंड आणि पाकचे गुण समान झाले तरी धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडने सेमीफायनमध्ये प्रवेश केला.

पाकचा कर्णधार सर्फराज अहमदने मायदेशी परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितलं की, पाकिस्तानच्या पहिल्या पराभवानंतरच धावगतीचा अभ्यास केला. त्यानंतर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र खेळपट्ट्यामुळे यश आलं नाही. वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याचं दु:ख जितकं देशातील लोकांना आहे तितकंच ते आम्हालाही आहे. कोणीही पराभूत होण्यासाठी जात नाही.

सर्फराजने सांगितलं की, पहिल्या 5 सामन्यात संघाची कामगिरी खराब राहिली. भारतविरुद्ध पराभवानंतरचे सात दिवस सर्वात वाईट होते. सामन्याच्या दोन दिवसानंतर खेळाडूंची बैठक झाली आणि यात आम्ही चर्चा केली. चुका सुधारण्यासाठी काय करता येईल यावर विचार केला. त्यानंतर पुढच्या चार सामन्यात संघाने चांगला खेळ केला. एक कर्णधार म्हणून मी आनंदी आहे.

Loading...

सर्फराज अहमद वर्ल्ड कपमध्ये पराभवाची जबाबदारी स्वीकारून कर्णधारपद सोडणार असं म्हटलं जात आहे. मात्र, मी कर्णधारपद सोडणार नाही. आता यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड निर्णय घेईल असं सर्फराजने सांगितलं. तसेच इतर पाकिस्तानी खेळाडू दोन दिवसांत पत्रकार परिषद घेतील असंही सर्फराजनं सांगितलं.

भारताच्या हेतुंवर शंका घेणं चुकीचं आहे. पाकिस्तानमुळं भारत हारला असं मला वाटत नाही. इंग्लंडने चांगली कामगिरी केली असं सर्फराजने पत्रकार परिषदेत सांगितलं. पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेटपटूंनी भारत पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी इंग्लंडविरुद्ध हारला असा आरोप केला होता.

World Cup : ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू जखमी, संघात घेतलेला 'हा' क्रिकेटर धोकादायक!

11 वर्षांनी पुन्हा विराटच्या वाटेत विल्यम्सनचा अडथळा, कोण मारणार बाजी?

VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 08:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...