लंडन, 07 जून : भारताचा पूर्व कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आपल्या चपळतेसाठी आणि यष्टीरक्षणासाठी ओळखला जातो. मात्र दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या सामन्यात धोनी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. यष्टीरक्षण करताना धोनीच्या ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह दिसून आले. हे चिन्ह होते, पैरा स्पेशल फोर्स या चिन्हाला बलिदान चिन्हही म्हटले जाते. क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार कधीच घडला नाही, की कोणत्या खेळाडूनं लष्काराचे चिन्ह सामन्या दरम्यान वापरले असेल.दरम्यान पॅरा कमांडोजच्या सदस्यांना हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते. यामुळं धोनीची तारिफ केली जात आहे. मात्र आता या प्रकरणावरुन वादंग सुरु झाला आहे.
धोनीच्या ग्लोव्ह्जवर पाकिस्तानचे विज्ञान मंत्री फवाद हुसैन यांनी, “धोनी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला आहे, महाभारतासाठी नाही. भारतीय मीडिया कोणत्याही गोष्टीवर चर्चा करु शकतो. भारतीय मीडियाला जर युध्दात एवढा रस असले तर त्यांना अफगाणिस्तान, सिरियी आणि रवांडा येथे पाठवले पाहिजे”.
आयसीसीनं बीसीसीआयकडे केली हे चिन्हा काढण्याची मागणी
या सगळ्या प्रकरणावर आयसीसीनं आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडू जे पेहराव परीधान करताता किंवा जी उपकरण वापरतात त्याबाबत काही नियम आहेत. पेहराव आणि उपकरणांवर राजकीय किंवा धार्मिक गोष्टी असू नयेत, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही बीसीसीआयला विनंती केली आहे.
International Cricket Council (ICC) has requested Board of Control for Cricket in India (BCCI) to get the 'Balidaan Badge' or the regimental dagger insignia of the Indian Para Special Forces removed from Mahendra Singh Dhoni's wicket-keeping gloves. pic.twitter.com/63rOjsCooX
— ANI (@ANI) June 6, 2019
टेरिटोरियल आर्मीमध्ये आहे धोनी
2011मध्ये महेंद्रसिंह धोनीला भारतीय लष्करातर्फे मानाची लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल करण्यात आली होती. धोनीने यासोबत पॅराट्रूपिंगचंही प्रशिक्षण घेतलं आहे. धोनी हा भारतीय सैनाच्या 106 पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. तर, 2015 साली प्रशिक्षण घेऊन धोनी पारंगत पॅराट्रूपर बनला होता. म्हणूनच या सामन्यात धोनी हे विशेष बलिदान चिन्ह असलेलं ग्लोव्ह्ज घालून मैदानात उतरला होता.
VIDEO : World Cup मध्ये भारताचे सामने फिक्स? पहिल्या विजयानंतर 'या' अफवा