World Cup : भारताला हरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का, लाजीरवाणा पराभव

अफगाणिस्ताननं 3 गडी राखून पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव केला.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 10:03 AM IST

World Cup : भारताला हरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का, लाजीरवाणा पराभव

लंडन, 25 मे : आयसीसी विश्वचषकाला केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्व संघांनी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. मात्र विश्वचषकाआधी पाकिस्तान संघाचा मोठा धक्का बसला आहे. एकीकडे भारताला हरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला सराव सामन्यातही विजय मिळवता आला नाही. अफगाणिस्ताननं 3 गडी राखून पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव केला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्ताननं अफगाणिस्तानला 263 धावांचे आव्हान दिले. मात्र, पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करता आली नाही. तर, अफगाणिस्तानच्या मधल्या फळीनं दमदार फलंदाजी केली, त्याच्या जोरावर त्यांनी हा सामना एकहाती जिंकला. पाकिस्तानच्या इमाम उल-हक आणि फखार झमान हे सलामीवीर संघाला अर्धशतकी मजल मारुन देली आणि ते माघारी परतले. यानंतर बाबर आझमने मधल्या आणि अखेरच्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेत संघाला चांगली धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान त्याने शतकही झळकावलं. दरम्यान अफगाणिस्तानच्या दमदार गोलंदाजीची जादू या सामन्यातही दिसली. मोहम्मद नाबीनं 3 तर दौलत झरदान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

पाकिस्ताननं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सुरुवातच आक्रमक केली. मोहम्मद शहझाद 23 धावांवर जखमी होऊन माघारी परतला. मात्र दुसऱ्या बाजूने हजरतउल्ला झझाईने आक्रमक फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. अवघ्या एका धावाने त्याचं अर्धशतक हुकलं. झझाई माघारी परतल्यानंतर हशमतुल्ला शाहिदी ने संघाचा डाव सावरला. मधल्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेऊन त्याने नाबाद 74 धावा केल्या. मात्र, पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करता आली नाही. तरी, पाकचा वादग्रस्त गोलंदाज वहाब रियाझनं सर्वात जास्त म्हणजे 3 विकेट घेतल्या. मात्र, या पराभवामुळं पाकिस्तानच्या अडचणी विश्वचषकात वाढणार आहे. एकीकडे भारताला हरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या संघाला अफगाणिस्तान विरोधात सामना जिंकता आला नाही. त्यामुळं विश्वचषकात त्यांचा टिकाव लागणार का, यावर आता प्रश्वचिन्ह उपस्थित होत आहे.

वाचा-हिटमॅनने सांगितलं, 2011 च्या वर्ल्ड कप संघातून त्याला का वगळलं?

वाचा- वर्ल्ड कपसाठी विराटला हवा 'हा' परदेशी खेळाडू!

Loading...

वाचा- World Cup : विराटचं टेंशन वाढलं, सामन्याआधीच महत्त्वाचा खेळाडू जखमी

वाचा- World Cup : ‘या’ खेळाडूमुळं वर्ल्ड कपआधी पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर


माजी आमदाराच्या कार्यक्रमात पैशांचा पाऊस, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 10:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...