World Cup : 'बांगलादेशवर तर वीज पडायला हवी', विजयासाठी पाकनं गाठली खालची पातळी

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून मोहम्मद युसूफनं हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 01:19 PM IST

World Cup : 'बांगलादेशवर तर वीज पडायला हवी', विजयासाठी पाकनं गाठली खालची पातळी

लंडन, 05 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लीग स्टेजमधील शेवटचा सामना होणार आहे. या सामन्यावर पाकिस्तानचे सेमीफायनलमधील भवितव्य अवलंबून आहे. न्यूझीलंडच्या पराभवामुळं आता जवळजवळ पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप बाहेर गेला आहे. मात्र आता पाकिस्तानला सेमीफायनल गाठण्यासाठी चमत्कारच मदत करू शकतो.

याबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून मोहम्मद युसूफनं एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना युसूफनं, देव करो आणि बांगलादेश संघावर वीज पडो, असे वक्तव्य केले आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर युसूफवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड सोडली आहे.

सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पाकिस्तान संघाला एखादी नैसर्गिक आपत्तीच वाचवू शकते, असे वक्तव्य मोहम्मद युसूफने केले आहे. तसेच "सामना सुरू असताना मैदानावर नैसर्गिक आपत्ती येवो किंवा वीज पडून खेळाडू अनफिट होऊ देत", असे वक्तव्य केले आहे.

Loading...

पाकच्या खेळाडूचा अजब आरोप

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ यांने आरोप लगावला आहे की, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला सामना फिक्स होता. लतीफ यांने दावा केला आहे की, "या दोन्ही संघाचा खेळ पाहता त्यांचे आव्हान पाकिस्तानला सेमीफायनलमधून बाहेर काढणे एवढेच होते". पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. "जेव्हा न्यूझीलंडच्या 4 विकेट गेल्या होत्या. तेव्हा मॉर्गननं आदिल रशीद आणि जो रुट यांच्याकडून गोलंदाजी करून घेतली, कारण न्यूझीलंड कमी धावांनी हरेल. त्याचबरोबर इंग्लंडनं खुप धिम्या गतीनं फलंदाजी करत 370पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत", असेही राशिदनं सांगितले.

बांगलादेशविरोधात असा असेल पाकिस्तानचा प्लॅन

वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीच्या सामन्यात खराब प्रदर्शन करणाऱ्या पाकिस्तान संघाला बांग्लादेशविरोधात गेल्या चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. जर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना 316 धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. यावर अहमदनं अजब विश्वास व्यक्त केला, "जर अल्लाहच्या मनात असेल तर चमत्कार होईल. ते असे आहे की 600, 500, 400 धावा करून त्याच मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला ५० धावांत बाद केल्यानंतरच 136 धावांच्या फरकाने विजय मिळवता येईल". बांगलादेशला पाकिस्तान विरोधात प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घ्यावा लागेल. तसेच, त्यांना 500 धावांचा डोंगर उभारावा लागणार आहे.

वेस्ट इंडिजनं बिघडवला पाकिस्तानचा खेळ

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे प्रदर्शन वाईट राहिले आहे. पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा फटका बसला होता. वेस्ट इंडिजनं 7 विकेटनं पाकला नमवले होते. पाकिस्तानचा संघ केवळ 105 धावात बाद झाला होता. त्यामुळं पाकिस्तानचा रनरेट मायन्समध्ये गेला. त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. तर, श्रीलंकेच्या संघाविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला.

वाचा- पाकचा कर्णधार बावळट त्यात संघ भित्रा, शोएब अख्तर पुन्हा भडकला

वाचा- 'अरे तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे', रोहितनं घेतली चहलची फिरकी

वाचा- World Cup : इंग्लंडमध्ये सुरक्षित नाही भारतीय संघ, ICCने केले हात वर

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 01:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...