World Cup : पाकला अजूनही वर्ल्ड कपची आशा, कर्णधारानं सांगितला सेमीफायनलचा फॉर्म्युला

World Cup : पाकला अजूनही वर्ल्ड कपची आशा, कर्णधारानं सांगितला सेमीफायनलचा फॉर्म्युला

ICC Cricket World Cup : पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना 316 धावांनी विजय मिळवावा लागणार आहे.

  • Share this:

लंडन, 05 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सुरुवातीच्या सामन्यात केलेल्या खराब कामगिरीमुळं पाकिस्तान संघाचे सेमीफायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न जवळजवळ भंगले आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंड संघाच्या विजयानं पाकिस्तानच्या आशा मावळल्या आहेत. दरम्यान आज बांगलादेशविरोधात होणाऱ्या शेवटच्या सामन्यात पाक संघाला मोठ्या धावसंख्येने हा सामना जिंकावा लागणार आहे. यामुळं पाक संघावर चाहते टीका करत आहे.

गुणतालिकेत पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तानला आज बांगलादेशविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवावा लागणार आहे. याबाबत पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज अहमदने शुक्रवारी एक अजब विश्वास व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना सफराजनं, "चमत्कार होईल आणि पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये जाणार", असा विश्वास व्यक्त केला आहे.

वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीच्या सामन्यात खराब प्रदर्शन करणाऱ्या पाकिस्तान संघाला बांग्लादेशविरोधात गेल्या चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. जर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना 316 धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. यावर अहमदनं अजब विश्वास व्यक्त केला, "जर अल्लाहच्या मनात असेल तर चमत्कार होईल. ते असे आहे की 600, 500, 400 धावा करून त्याच मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला ५० धावांत बाद केल्यानंतरच 136 धावांच्या फरकाने विजय मिळवता येईल".

बांगलादेशला पाकिस्तान विरोधात प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घ्यावा लागेल. तसेच, त्यांना 500 धावांचा डोंगर उभारावा लागणार आहे. तरच पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. त्यांच्यासाठी सध्या नेटरनरेट खुप महत्त्वाचा आहे.

वेस्ट इंडिजनं बिघडवला पाकिस्तानचा खेळ

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे प्रदर्शन वाईट राहिले आहे. पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा फटका बसला होता. वेस्ट इंडिजनं 7 विकेटनं पाकला नमवले होते. पाकिस्तानचा संघ केवळ 105 धावात बाद झाला होता. त्यामुळं पाकिस्तानचा रनरेट मायन्समध्ये गेला. त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. तर, श्रीलंकेच्या संघाविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला.

बांगालदेशनं भारताला दिले होते कडवे आव्हान

पाकिस्तानला बांगलादेशविरोधात विजय मिळवणे सोपे जाणार नाही. याआधी भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांनी भारताला कडवे आव्हान दिले होते. भारतानं दिलेल्या 314 धावांचा पाठलाग करताना सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत गेला होता. बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले असले तरी, शाकिब-अल-हसन पाकिस्तानवर भारी पडू शकतो.

वाचा- पाकचा कर्णधार बावळट त्यात संघ भित्रा, शोएब अख्तर पुन्हा भडकला

वाचा- 'अरे तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे', रोहितनं घेतली चहलची फिरकी

वाचा- World Cup : इंग्लंडमध्ये सुरक्षित नाही भारतीय संघ, ICCने केले हात वर

VIDEO: अर्थसंकल्प ते क्रिडा क्षेत्रापर्यंतच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

First published: July 5, 2019, 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading