World Cup : पाकिस्तान पुन्हा 1992 च्या वाटेवर? पण हाच इतिहास ठरणार अडथळा!

World Cup : पाकिस्तान पुन्हा 1992 च्या वाटेवर?  पण हाच इतिहास ठरणार अडथळा!

ICC Cricket World Cup : पाकिस्तानने 1992 च्या वर्ल्ड कपप्रमाणे 2019 मध्ये कामगिरी केली असली तरी त्यांना इतिहासच अडचणीचा ठरेल.

  • Share this:

लंडन, 30 जून : पहिलाच सामना गमावल्यानंतर पाकची अडखळत सुरुवात झाली. त्यांची 2019 च्या वर्ल्ड कपमधील वाटचाल ही 1992 च्या वर्ल्ड कपप्रमाणेच सुरू आहे. पुढच्या सामन्यातही अशीच कामगिरी राहिली तर ते जग्गजेते होऊ शकतात. अर्थात त्याासठी त्यांना उर्वरित सामन्यात विजय मिळावावा लागेल. पाकिस्तानचा आता एक सामना उरला असून त्यात विजय मिळवल्यानंतर त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागेल. पाकिस्तानने 8 पैकी 4 सामने जिंकले असून एक सामना पावसाने वाया गेला. यासह त्यांचे 9 गुण झाले आहेत. आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवल्यास सेमीफायनल गाठता येईल. मात्र, त्यासाठी इंग्लंडचा दोन्ही सामन्यात पराभव झाला तरच हे शक्य आहे.

पाकिस्तानने 1992 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी जशी परिस्थिती होती अगदी तशीच आताही आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पाकिस्तानची त्यावेळी सुरुवातीच्या सामन्यात पराभव, पावसाने सामना रद्द आणि पुन्हा विजय अशीच वाटचाल होती. शेवटच्या टप्प्यात त्यांनी कामगिरीत सुधारणा करत वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.

दरम्यान, 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकचे आतापर्यंतचे रेकॉर्ड आणि 1992 चे रेकॉर्ड यात काही फरक नाही. पाकिस्तानचे आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 8 सामने झाले आहेत. यातील त्यांचा निकाल हा 1992 च्या पहिल्या 8 सामन्यांप्रमाणेच आहे. पुढची परिस्थिती त्यांना अनुकूल राहिली तर ते सेमिफायनलला पोहचू शकतात. सध्या इंग्लंड चौथ्या क्रमांकावर असून त्यांचे पुढचे सामने न्यूझीलंड आणि भारतासोबत आहेत. यात इंग्लंडचा एका सामन्यात जरी पराभव झाला तरी पाकिस्तानला सेमीफायनलला संधी मिळू शकते.

1992 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभव झाला होता. त्यानंतर दुसरा सामना जिंकला होता तर तिसरा सामना होऊ शकला नव्हता. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात पराभव झाल्यानंतर पुढचे सर्व सामने जिंकले होते. 2015 च्या वर्ल्ड कपमध्येसुद्धा त्यांनी पाचव्या सामन्यातील पराभवानंतर सलग तीन सामने जिंकले आहेत.

पाकिस्तानने 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये सहाव्या सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला होता. तेव्हा आमिर सोहेल सामनावीर ठरला होता. त्यानंतर आता 2019 मध्ये सहाव्या सामन्यात पाकिस्तानने 49 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हॅरिस सोहेलला सामनावीर मिळाला होता.

World Cup : पंतला संधी नाहीच! धोनी आणि शंकरबद्दल काय म्हणाला विराट?

1992 च्या वर्ल्ड कपप्रमाणे 2019 मध्ये रॉबिन राऊंड पद्धतीने सामने खेळवण्यात आले आहेत. पाकिस्तानची आतापर्यंतची वाटचाल 1992 च्या वर्ल्ड कपसारखीच असली तरी तोच इतिहास त्यांना अडचणीचाही ठरेल. 1992 मध्ये साखळी फेरीत 8 सामने झाले होते तर यावेळी 9 सामने आहेत. त्याचबरोबर भारताने त्यांना पराभूत केलं होतं. मात्र, भारत साखळी फेरीतून बाहेर पडला होता. यंदा भारत गुणतक्त्यात पहिल्या स्थानी आणि पाक चौथ्या स्थानावर राहिल्यास सेमीफायनलला भारत-पाक लढत होईल. आतापर्यंतचा भारत-पाक लढतीचा इतिहास पाकिस्तानला सेमीफायनलमधून घरी पाठवू शकतो. यातही सेमीफायनलला न्यूझीलंडशी गाठ पडली तर पाकिस्तान पुन्हा लकी ठरेल. 1992 ला त्यांनी न्यूझीलंडला पराभूत करून फायनलला धडक मारली होती.

World Cup : शोएब अख्तरचा भारतावर गंभीर आरोप!

पाकिस्तान जरी सेमी फायनलला पोहचले तरी त्यांच्यासमोर बलाढ्य संघांचे आव्हान असेल. सेमीफायनलला ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांचे स्थान पक्कं आहे. यात ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध पाकचा पराभव झाला आहे. तर न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत हेच पहिल्या दोन स्थानावर राहतील असं सध्याच्या गुणतक्त्यावरून दिसत आहे. असे झाल्यास पाकला या दोन संघापैकी एका संघाशी सेमीफायनलमध्ये लढावं लागेल. तिथं त्यांची कामगिरी कशी असेल त्यावर अंतिम फेरीतील तिकीट ठरणार आहे.

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

First published: June 30, 2019, 7:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading