World Cup : पाकची बांगला टायगर्ससमोर केविलवाणी धडपड, पराभूत होणार?

World Cup : पाकची बांगला टायगर्ससमोर केविलवाणी धडपड, पराभूत होणार?

ICC Cricket World Cup पाकच्या सेमीफायनलच्या आशा संपुष्टात, मोठा विजय तर दूरच आता सामना वाचवण्यासाठी धडपड.

  • Share this:

लॉर्ड्स, 05 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेत सेमीफायनलला पोहचण्याच्या पाकच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. बांगालदेशविरुद्ध नाणेफेक जिंकून मोठी धावसंख्या उभारण्याची गरज असताना फलंदाज धावांसाठी धडपडताना दिसत आहेत. सलामीवीर लवक बाद झाला. त्यानंतर बाबर आझम आणि इमाम उल हकने डाव सावरला. मात्र, बाबर आझमचं शतक हुकलं. तो 96 धावांवर पायचित झाला.

पाकिस्तानला वर्ल्ड कपच्या सेमीफायनलला पोहचण्यासाठी दोन पर्याय होते. यात एक पहिल्यांदा फलंदाजी करताना 350 पेक्षा जास्त धावा करून 38 धावांच्या आता बांगलादेशला ऑलआउट करणं. जर पाकने 400 धावा केल्या तर त्यांना बांगलादेशला 84 धावांत गुंडाळावं लागेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या विजयाची नोंद न्यूझीलंडच्या नावावर आहे. त्यांनी 2008 मध्ये आयर्लंडला 290 धावांनी पराभूत केलं होतं. पाकिस्तानला हा चमत्कार करण्यासाठी 400 धावांचा टप्पा पार करावा लागेल. मात्र त्यांच्या 32 षटकांत 180 धावा झाल्या आहेत. आता पाकिस्तान मोठा विजय नाही तर बांगलादेशकडून पराभव होऊ नये म्हणून खेळत असल्याचं दिसत आहे.

पाकिस्तानने 8 सामन्यात 4 विजय मिळवले तर तीनमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यांचा लंकेविरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला. त्यामुळे संघाला पाचव्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. पाकिस्तानला वेस्ट इंडीजविरुद्ध पराभवानं मोठा दणका बसला.

सेमीफायनलला चार संघ आता निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही संघांचे प्रत्येकी एक सामना उरला आहे. त्यात विजय पराभव पहिले आणि दुसरे स्थान ठरवणार आहे. तर तिसऱ्या स्थानी इंग्लंड असून चौथ्या स्थानावर न्यूझीलंड आहे.

सेमीफायनलचा पहिला सामना 9 जुलैला होणार आहे. तर दुसरा सामना 11 जुलैला होणार आहे. रविवारी 14 जुलैला अंतिम सामना लॉर्ड्सवर होणार आहे.

World Cup : श्रीलंकेविरोधात बुमराह खेळण्याची शक्यता कमी, कोण घेणार जागा?

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

First published: July 5, 2019, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading