World Cupमध्ये विराटवर संतापला इंग्लंडचा खेळाडू, मैदानातील ‘त्या’ कृतीवरून केला पलटवार

World Cupमध्ये विराटवर संतापला इंग्लंडचा खेळाडू, मैदानातील ‘त्या’ कृतीवरून केला पलटवार

ज्या कृतीची जगानं केली तारिफ त्याच कृतीवरून इंग्लंडच्या खेळाडूनं कोहलीला सुनावले खडेबोल

  • Share this:

लंडन, 12 जून : ICC World Cupमध्ये सध्या सर्व संघ गुणतालिकेत अव्वल चार क्रमांकावर येण्यासाठी धडपडत आहेत. तर, वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ आपली विजयी घौडदौड कायम राखण्यास सज्ज आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला धुळ चारल्यानंतर आता विराट सेना न्यूझीलंडला हरवण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीनं दाखवलेल्या खिळाडूवृत्तीची चर्चा सगळीकडे होत आहे. या सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांनी स्मिथ आणि वॉर्नरला चीटर,चीटर म्हणण्यास सुरुवात केली. यावेळी विराटनं भारतीय चाहत्यांना समज देत, स्मिथ आणि वॉर्नरसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले.

कोहलीच्या या मोठेपणाचे कौतुक सगळीकडे होत असताना, आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्चन याने मात्र याच गोष्टीवरुन विराटला टार्गेट केले आहे. त्यानं ट्विटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यात विराट कोहलीला मैदानातल्या प्रेक्षकांना काय करावे आणि काय करु नये असे सांगण्याचा अधिकार नाही, मला त्याचं वागणं पटलं नाही, असे मत व्यक्त केले.

अनधिकृतपणे चेंडू कुरतडल्याप्रकरणी शिक्षा पूर्ण करून राष्ट्रीय संघात कमबॅक करणाऱ्या स्मिथ व डेव्हिड वॉर्नरसाठी हुटिंगचा प्रकार नवीन नाही. याआधी सराव सामन्यातही त्याना चीटर, चीटर असं संबोधित करण्यात आले होते. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात चाहते जाणीवपूर्वक स्मिथला डिवचत आहेत. पण, कोहलीनं चाहत्यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना स्मिथसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले. या प्रसंगानं स्मिथही भारावून गेला, आणि त्यानं कोहलीशी हस्तांदोलन केले. दरम्यान नेटेकरही विराटच्या या Spirit of cricket वर खुश आहेत. त्यामुळं इंग्लंडचा हा माजी क्रिकेटपटू टीकेचा धनी होतं आहे. भारतीय चाहत्यांनी तु विराटचा शिकवू नको, अशा शब्दात खेडेबोल सुनावले.

विराटनं मागितली स्मिथची माफी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत विराटनं,' भारतीय प्रेक्षकांकडून झालेल्या कृतीसाठी मी माफी मागतो. वॉर्नर आणि स्मिथला डिवचण्याचा प्रकार याआधी देखील झाला आहे. या मॅचदरम्यान मोठ्या प्रमाणावर टीम इंडियाचे समर्थक उपस्थित होते. वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर टीका करण्यासारखं त्यांनी काहीचं केले नाही. त्यांनी केलेल्या चुकीसाठी त्यांनी शिक्षा भोगली आहे. जे झालं ते पुन्हा पुन्हा बोलून एखाद्याचं मनोधर्य़ कमी करु नये. तो चांगली कामगिरी करतो आहे', असे सांगत स्मिथ आणि वॉर्नरची माफी मागितली.

SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?

First published: June 12, 2019, 12:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading