World Cup : दक्षिण आफ्रिकेला दुष्काळात तेरावा महिना, 'हा' प्रमुख खेळाडू जखमी

याआधी दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज डेल स्टेन दुखापतीमुळं सामना खेळू शकला नव्हता.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 12:55 PM IST

World Cup : दक्षिण आफ्रिकेला दुष्काळात तेरावा महिना, 'हा' प्रमुख खेळाडू जखमी

लंडन, 03 मे : कागदावर बलाढ्य वाटणारा मात्र, चोकर्स या नावाने प्रसिध्द असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाच्या अडचणी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वाढल्या आहेत. पहिल्या दोन सामन्यात मानहानीकारक पराभव स्विकारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ बुधावारी भारतीय संघाविरोधात भिडणार आहे. मात्र या सामन्याआधीच दक्षिण आफ्रिका संघाला मोठा फटका बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ यंदाच्य वर्ल्ड कपमध्ये विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, सलामीच्या सामन्यात इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला मोठा दणका दिला. त्यामुळं दक्षिण आफ्रिका संघाची कमकुवत बाजू दिसून आली.

तर, दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका दिला तो, बांगलादेश सारख्या कागदावर कमकुवत असलेल्या संघाने. रविवारी बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. नावाजलेले फलंदाज व गोलंदाज संघात असूनही आफ्रिकेला हार मानावी लागल्यानं क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान आता पराभवाचे सत्र सुरु असताना त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज लुंगी एनगिडीला दुखापतीमुळे आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज डेल स्टेन दुखापतींमुळं सामना खेळू शकला नव्हता.रविवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात डाव्या पायूचे स्नायू ताणले गेल्यानं एनगिडीनं चार षटकांनंतर मैदान सोडले. त्यानंतर तो पुन्हा गोलंदाजी करायला आला नाही. त्याचा फटका आफ्रिकेला बसला आणि बांगलादेशने 330 धावा चोपून काढल्या. त्यामुळं आता एनगिडीच्या दुखापतीमुळं डेल स्टेनला भारताविरुद्ध संधी मिळू शकते. दरम्यान जोफ्रा आर्चरचा बाउंसर हाशिम अमलाच्या डोक्याला लागला होता. त्यामुळं त्याला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात मैदानात सोडावे लागले होते. याच कारणामुळं अमला बांगलादेशविरुद्ध खेळू शकला नाही. त्यामुळं दक्षिण आफ्रिका संघापुढं आजारी खेळाडू आणि पराभवाची मालिका सुरु आहे. त्यामुळं कर्णधार ड्युप्लेसिसही चिंतेत आहे. बुधवारी भारताविरोधात होणारा सामना दक्षिण आफ्रिकेला जिंकावाच लागणार आहे.

वाचा- World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

वाचा- World Cup : विराट कोहलीचा मोठा खुलासा, टीममधला ‘हा’ खेळाडू आहे माझ्या विरोधात

वाचा- World Cup : केएल राहुलच्या अडचणी वाढल्या, चौथ्या क्रमांकाचा ‘हा’ दावेदार झाला फिट


VIDEO : दोन दिवसांत वादळासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, पाहा 'टॉप 18 बातम्या'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 12:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...