World Cup : न्यूझीलंडचा सेमीफायनलचा 'हा' हिरो झाला फायनलमध्ये विलन

World Cup : न्यूझीलंडचा सेमीफायनलचा 'हा' हिरो झाला फायनलमध्ये विलन

फक्त वर्ल्ड कपच नव्हे तर वनडे क्रिकेटच्या इतिहासात असा सुपरहीट सामना झाला नसले.

  • Share this:

लंडन, 15 जुलै: ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक अंतिम सामना झाला. या श्वास रोखून ठेवणाऱ्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये अधिक चौकाराच्या जोरावर बाजी मारली. फक्त वर्ल्ड कपच नव्हे तर वनडे क्रिकेटच्या इतिहासात असा सुपरहीट सामना झाला नसले. या सामन्यात अनेक थरारक घटना घडल्या. निर्धारीत 50 षटकात सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये देखील पुन्हा तो टाय झाला. अखेर इंग्लंडने अधिक चौकार कोणी मारले यावर बाजी मारली आणि पहिल्यांदा विजेतेपद मिळवले.

मात्र या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती मार्टिन गुप्टिलच्या ओव्हर थ्रोची. अखेरच्या षटकात इंग्लंडला 15 धावांची गरज होती. मात्र गुप्टिलच्या ओव्हर थ्रोमुळं एकाच चेंडूवर दोन धावांच्या बदली इंग्लंडला 6 धावा मिळाल्या. गुप्टिलच्या या एका चूकीमुळं न्यूझीलंडनं सामना गमावला. जर तो ओव्हर थ्रो झाला नसता तर, न्यूझीलंड हा सामना दोन गुणांनी जिंकला असता. त्यानंतर सुपर ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर मार्टिन गुप्टिल धावबाद झाला. दरम्यान गुप्टिल धावबाद झाला यावर सर्वाधिक चर्चा केली ती भारतीय चाहत्यांनी. गुप्टिलच्या एका थ्रो मुळेच भारताचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले होते. सेमीफायनलमध्ये गुप्टीलने धोनीला धावबाद करुन भारताचा पराभव केला होता. त्याच गुप्टिलला न्यूझीलंडला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठीची धाव घेत आला नाही आणि तो धावबाद झाला. भारतीय चाहत्यांनी गुप्टिलला धोनीला धावबाद केल्याच्या क्षणाची आठवण करून दिली.

वाचा- World Cup : इंग्लंडच्या विजयानंतर पेटला वाद, ICCला दिग्गजांनी धरले धारेवर

भारताविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये अखेरच्या षटकांमध्ये गुप्टिलने धोनीला धावाबाद केले होते. धोनी धावबाद झाल्याने भारतीय संघाचे आव्हान संपुष्ठात आले. या घटनेनंतर गुप्टिलच्या थ्रोची चर्चा सर्व क्रिकेट जगतात होती. धोनीचे धावाबाद होणे ही क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असल्यासारखी वाटू लागली. योगायोग म्हणजे रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात गुप्टिल सोबत अशीच घटना घडली जशी धोनी सोबत झाली होती.

वाचा- World Cup: फायनलमध्ये पंचांनी केल्या चुका, म्हणून जिंकले इंग्लंड...

सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयासाठी 2 धावांची गरज होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणारा गुप्टिल धावबाद झाला. सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाल्याने सर्वाधिक चौकार आणि षटकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले.

वाचा- इंग्लंडनं पहिल्यांदाच जिंकला वर्ल्ड कप, तरी ICCने दिली नाही खरी ट्रॉफी

इंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

First published: July 15, 2019, 2:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading