World Cup : न्यूझीलंडनेच जिंकलाय वर्ल्ड कप! वाचा ICCचा नियम क्रमांक 19.8

World Cup : न्यूझीलंडनेच जिंकलाय वर्ल्ड कप! वाचा ICCचा नियम क्रमांक 19.8

न्यूझीलंडकडे सुपर ओव्हर होण्याआधीच सामना जिंकण्याची संधी होती, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये एका ओव्हरथ्रोनं सामन्याचे चित्र पालटले.

  • Share this:

लॉर्ड्स, 15 जुलै : ICC Cricket Worldच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना रोमांचक झाला. टाय झालेला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, मात्र सुपरओव्हरमध्येही हा सामना टाय झाला. अखेर जास्त चौकारांच्या जोरावर इंग्लडनं सामना जिंकला. दरम्यान, न्यूझीलंडकडे सुपर ओव्हर होण्याआधीच सामना जिंकण्याची संधी होती, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये एका ओव्हरथ्रोनं सामन्याचे चित्र पालटले.

शेवटच्या ओव्हरमध्ये तीन चेंडूत इंग्लंडला 9 धावांची गरज होती. जेव्हा डीप मिडविकेटवरून गुप्टिलनं केलेला थ्रो, बेन स्टोकच्या बॅटला लागून बाऊंड्री बाहेर गेला. त्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी दुसरे पंच इरासमुस यांच्याशी चर्चा करत, इंग्लंडला सहा धावा दिल्या. यात दोन धावा खेळाडूंनी धावत काढल्या तर, चार धावा ओव्हरथ्रोच्या मिळाल्या. या सहा धावांमुळं 242 धावांचा पाठलाग करणारा इंग्लंड 241 धावा करू शकला. त्यामुळं हा सामना टाय झाला.

एका धावेने बदललं चित्र

इएसपीएन या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या थ्रोवर इंग्लंडनं सहा धावा केल्या तिथं केवळ पाच धावा देणे गरजेचे होते. खेळाच्या नियमानुसार इंग्लंडला एक धाव अधिक मिळाली, यामुळं सामन्याचे रूप पालटलं.

वाचा- World Cup : इंग्लंडच्या विजयानंतर पेटला वाद, ICCला दिग्गजांनी धरले धारेवर

Loading...

वाचा- World Cup: फायनलमध्ये पंचांनी केल्या चुका, म्हणून जिंकले इंग्लंड...

ICCचा 19.8 नियम सांगतो वेगळी कहाणी

ओव्हर थ्रोसाठी आयसीसीनं दिलेल्या 19.8 नियमानुसार जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूमुळं जर चेंडू सीमापार गेला तर, त्याचा फायदा दुसऱ्या संघाला होतो. मात्र जर, फलंदाजानं थ्रो करण्याआधी धाव पूर्ण केली नसेल तर, एक अतिरिक्त धाव फलंदाजाला मिळत नाही. त्यामुळं जेव्हा गुप्टिलनं थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स क्रिजमध्ये नव्हता. त्यामुळं दोन रन ऐवजी केवळ एक धाव देणे गरजेचे होते. त्यामुळं पंचाच्या एका चूकीमुळं न्यूझीलंडला वर्ल्ड कप गमवावा लागला.

वाचा- इंग्लंडनं पहिल्यांदाच जिंकला वर्ल्ड कप, तरी ICCने दिली नाही खरी ट्रॉफी

इंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...