IND vs ENG : 1947 असो किंवा 2019 'जब इंग्लंड हारेगा तभी तो पाकिस्तान आयेगा', नव्या मौका-मौका अ‍ॅडची चर्चा

IND vs ENG : 1947 असो किंवा 2019 'जब इंग्लंड हारेगा तभी तो पाकिस्तान आयेगा', नव्या मौका-मौका अ‍ॅडची चर्चा

भारताच्या विजयावर पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे भवितव्य अवलंबून आहे.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 30 जून: ICC Cricket World Cupमध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात हायवोल्टेज सामना होणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. मात्र या विजयाची सर्वात जास्त गरज आहे ती इंग्लंडला. कारण इंग्लंजकरिता हा सामना करो या मरो असणार आहे. सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकावा लागणार आहे. तर, भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी सध्या केवळ एका विजयाची गरज आहे. पण भारताच्या विजयामुळं फक्त भारतालाच नव्हे तर, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनाही फायदा होणार आहे.

भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास पाक आणि बांगलादेशचे सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा शिल्लक राहतील. सध्या गुणतालिकेत, 14 गुणांसह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. भारत 11 गुणांसह दुसऱ्या तर न्यूझीलंड 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने अफगाणस्तानवर विजय मिळवल्यामुळे ते 9 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. तर स्पर्धेत पहिल्यापासून दमदार कामगिरी करणारा इंग्लंड 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. बांगलादेश 7 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळं क्रिकेटच्या इतिहासात कदाचित प्रथमत 130 कोटी भारतीयांसोबत 20 कोटी पाकिस्तानी आणि 15 कोटी बांगलादेशी विराटसेनेच्या विजयासाठी प्रार्थना करतील.

याचाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात भारत आणि पाकिस्तानचे चाहते यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे. पाकिस्तानचा चाहता, "इंग्लंड विरोधात हरणार तर नाही ना", असा सवाल करतो. यावर भारतीय चाहता,"1947 असो किंवा 2019 इंग्लंडच्या पराभवानंतरच पाकिस्तान येतो". हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान पाकिस्ताननं अखेरच्या षटकात अफगाणिस्तानवर विजय मिळवत आपले आव्हान कायम ठेवले आहे. या विजयासह पाकिस्तानने 9 गुणांची कमाई करत चौथे स्थान पटकावले आहे. इंग्लंडचे आतापर्यंत आठ गुण आहेत, त्यामुळे त्यांची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर साऱ्यांनाच नजरा असतील. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीतील स्थान पक्के करेल.

वाचा- World Cup:क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका सामन्यावर 165 कोटी लोकांची नजर!

वाचा- World Cup: भारत सेमीफायनलमध्ये जाणार की इंग्लंड इतिहास बदलणार!

वाचा- World Cup: पाकच्या विजयानंतर मैदानात चाहत्यांचा राडा; खेळाडूंनाही सोडलं नाही!

ब्रेकअपचा बदला, प्रेयसीवर केले 12 वार आणि स्वत:चाही चिरला गळा!

First published: June 30, 2019, 1:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading