World Cup : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान करणार भारताला सपोर्ट? दिग्गज फलंदाजाच्या प्रश्नाने नवी चर्चा

World Cup : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान करणार भारताला सपोर्ट? दिग्गज फलंदाजाच्या प्रश्नाने नवी चर्चा

पाकिस्तानला सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी भारतावर अवलंबून रहावे लागणार आहे.

  • Share this:

लंडन, 28 : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. वेस्ट इंडिजला नमवत भारतानं सलग पाचवा विजय नोंदवला आहे. त्यामुळे सेमीफायनलचे भारताचे तिकीट जवळजवळ निश्चित झाले आहे. असे असले तरी, सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला एका विजयाची गरज आहे. भारताचा पुढचा सामना रविवारी इंग्लंड विरोधात होणार आहे. मात्र भारताला जेवढी या विजयाची गरज आहे. तेवढीच गरज पाकिस्तानलाही आहे.

सध्या वर्ल्ड कपमध्ये लीग स्टेजमधील सामने संपत आले आहेत. त्यामुळं सर्व संघ सेमीफायनलसाठी प्रयत्नशील आहेत. यात ऑस्ट्रेलियानं आपले स्थान पक्के केले आहे. चौथ्या क्रमांकासाठी इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात शर्यत आहे. दरम्यान पाकिस्तान संघाला सेमीफायनलमध्ये जागा बनवण्यासाठी टीम इंडियाच्या खेळीकडे लक्ष आहे. कारण पाकिस्तानचा निर्णय हा भारताच्या हातात आहे. सध्या गुणतालिकेत इंग्लंडचा संघ सध्या 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचे आता सध्या दोन सामने बाकी आहेत. ते सामने न्यूझीलंड आणि भारत अशा दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी संघासोबत होणार आहेत. जर इंग्लंडनं हे दोन्ही सामने जिंकले तर इंग्लंडचे 12 गुण होतील.

याचसंदर्भात इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी चाहत्यांना एक सवाल केला आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात पाक चाहते, भारत की इंग्लंड कोणाची बाजू घेणार. यावर पाकिस्तानी चाहत्यांनी आम्ही आमच्या शेजाऱ्यांना मदत करू अशी उत्तरे दिली आहे.

नासिर यांच्या ट्विटनंतर भारत-पाकिस्तान दोन्ही देशांतील चाहत्यांनी त्यांना ट्रोल केले. भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानची बाजू घेत, पाकिस्तानचे खेळाडू क्रिकेटला मानतात त्यामुळं ते भारताच्या बाजून असतील असे सांगितले.

भारताच्या विजयासाठी पाकिस्तानचे देवाला साकडे

पाकिस्तानबाबत बोलायचे झाल्यास, 7 गुणांसह पाकचा संघ 6व्या क्रमांकावर आहे. पाकचे अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरोधात 2 सामने बाकी आहेत. जर, पाकिस्तान दोन्ही सामने जिंकले तर, त्यांचे 11 गुण होतील.दरम्यान पाकिस्तान अजूनही सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्वित करू शकतो. मात्र त्यासाठी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताला विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळं पाकिस्तान संघाचे चाहते सध्या भारताच्या विजयासाठी देवाला साकडे घालत आहेत.

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

First published: June 28, 2019, 1:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading