Elec-widget

World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात धोनी बरोबरच त्याच्या ग्लोव्ह्जची चर्चा चांगलीच रंगली.

  • Share this:

लंडन, 06 जून : तब्बल एका आठवड्यानंतर भारतीय संघानं आपला सलामीचा सामना खेळला आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत तिसरा धक्का दिला. दरम्यान या सामन्यात सलामीला आलेल्या रोहित शर्मानं शतकी खेळी करत भारताला हा सामना जिंकून दिला. मात्र या सामन्यात सर्वांचे मन जिंकले ते महेंद्रसिंग धोनीनं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात धोनी बरोबरच त्याच्या ग्लोव्ह्जची चर्चा चांगलीच रंगली.

दक्षिण आफ्रिकेनं प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम गोलंदाजी करताना, धोनीच्या एका कृतीमुळं चाहते त्याच्यावर चांगलेच खुश झाले आहेत. यष्टीरक्षण करताना धोनीच्या ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह दिसून आले. हे चिन्ह होते, पैरा स्पेशल फोर्स या चिन्हाला बलिदान चिन्हही म्हटले जाते. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धोनीनं भारताच्या पहिल्या सामन्यात भारतीय सैन्यदलाला एक अद्भूत सन्मान दिला आहे. क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार कधीच घडला नाही, की कोणत्या खेळाडूनं लष्काराचे चिन्ह सामन्या दरम्यान वापरले असेल.दरम्यान पॅरा कमांडोजच्या सदस्यांना हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते. यामुळं धोनीची तारिफ केली जात आहे.Loading...

याआधी 2011 साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीला भारतीय लष्करातर्फे मानाची लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल करण्यात आली होती. धोनीने यासोबत पॅराट्रूपिंगचंही प्रशिक्षण घेतलं आहे. धोनी हा भारतीय सैनाच्या 106 पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. तर, 2015 साली प्रशिक्षण घेऊन धोनी पारंगत पॅराट्रूपर बनला होता. म्हणूनच या सामन्यात धोनी हे विशेष बलिदान चिन्ह असलेलं ग्लोव्ह्ज घालून मैदानात उतरला होता.काय आहे हे चिन्ह ?

धोनीनं आपल्या ग्लोव्ह्जला वापरलेले हे चिन्ह पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे हे विशेष बलिदान चिन्ह असतं. या चिन्हावर देवनागरी लिपीमध्ये ‘बलिदान’ असं लिहीलेलं असतं हे चिन्ह चांदीपासून बनवलेलं असतं.

वाचा- World Cup : भारताच्या ‘या’ शिलेदारांनी फेरले दक्षिण आफ्रिकेच्या आशांवर पाणी

वाचा- VIDEO : फक्त 120 सेकंदात पाहा कशी केली रोहितनं आफ्रिकन सफाई !

वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 12:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...