World Cup आणि IPL मध्ये धोनीचं असंही दुर्दैव, दोन्ही वेळा स्वप्नभंग!

World Cup आणि IPL मध्ये धोनीचं असंही दुर्दैव, दोन्ही वेळा स्वप्नभंग!

ICC Cricket World Cup : धोनी मैदानात होता तोपर्यंत भारताला विजयाच्या आशा होत्या. तो धावबाद झाल्यानंतर भारताचा डाव संपुष्टात आला.

  • Share this:

मँचेस्टर, 10 जुलै : अखेरचा वर्ल्ड कप खेळत असलेल्या भारताच्या महेंद्रसिंग धोनीला धावबाद व्हावं लागलं. धोनी बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनी 72 चेंडूत 50 धावा काढून बाद झाला. मार्टिन गुप्टिलच्या थेट फेकीवर तो धावबाद झाला. बाद झाल्यानंतर धोनी खूपच निराश दिसत होता.

एकेरी आणि दुहेरी धावा काढताना धावण्यात धोनी जास्त चपळ आहे. मात्र, सेमीफायनलमध्ये तो कमनशिबी ठरला.  यंदा तो दुसऱ्यांदा महत्त्वाच्या सामन्यात धावबाद झाला. विशेष म्हणजे धोनीच्या धावबाद होण्यानंतर सामन्याचे चित्र बदलले.

आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात धोनी धावबाद झाला होता. यातही शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जला पराभूत व्हावं लागलं होतं. त्या सामन्यात धोनीचं धावबाद होणं वादग्रस्त ठरलं होतं.

धोनीच्या निवृत्तीची चर्चा सध्या होत आहे. जर खरंच धोनीनं निवृत्ती घेतली तर क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात आणि शेवट धावबाद होऊन होईल. धोनी पदार्पणाच्या सामन्यात धावबाद झाला होता विशेष म्हणजे तो तेव्हा आणि आताही सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

VIDEO : सदाभाऊंच्या कार्यक्रमात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 09:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading