World Cup : धोनीचा मोठा खुलासा, अंधश्रद्धाळू असल्यामुळं सामन्याआधी करतो ‘हे’ काम

बांगलादेशविरोधात धोनीनं शतकी खेळी केली. त्यामुळं तो पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 01:01 PM IST

World Cup : धोनीचा मोठा खुलासा, अंधश्रद्धाळू असल्यामुळं सामन्याआधी करतो ‘हे’ काम

लंडन, 04 जून : आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही, त्यामुळं भारताचा पहिला सामना बुधावरी दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहे. या सामन्यात भारताचे पारडे हे दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त जड आहे. कारण दक्षिण आफ्रिकेने याआधी झालेल्या दोन्ही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. तरी विराटच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सज्ज आहे. मात्र पहिल्या आधी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, धडाकेबाज फलंदाज आणि उत्कृष्ट विकेटकीपर म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी यानं एक मोठा खुलासा केला आहे.

महेंद्रसिंग धोनीनं एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, “जगभरातील सर्व क्रिकेटर कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामुळं मी सुध्दा अंधश्रद्धाळू आहे. मी जेव्हाही मैदानावर उतरतो, तेव्हा आधी उजवा पाय मैदानात आधी ठेवतो. कधी कधी तर, डावा आणि उजवा पाय यांच्यात गोंधळतो, असेही धोनी म्हणाला. दरम्यान धोनी 7 नंबरला लकी मानतो, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याचा जन्म हा 7 जुलैला झाला. त्यामुळे तो नेहमी 7 नंबरच्या जर्सीमध्ये दिसतो. या ७ नंबरच्या आकड्याला तो त्याच्या या यशाचे श्रेय देतो. तसेच, धोनीनं माझ्याकडे उपाय असतात तेव्हा मी चांगला विचार करु शकतो, असेही सांगितले. एकवेळ अशी होती जेव्हा धोनीनं 23-33 सामन्यात नाणेफेक हरावी लागली होती. यात कसोची सामन्यांचा समावेश जास्त होता. तेव्हा धोनी, मागच्या सामन्यात जे बोललो आहे ते नाही बोलायचे असे ठरवले होते. मात्र त्याचा काही फायदा नाही झाला.

धोनीचा फॉर्म भारतासाठी महत्त्वाचा

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरोधात धोनीनं शतकी खेळी केली. त्यामुळं तो पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला. धोनीनं या सामन्यात 78 चेंडूत 113 धावांची खेळी केली. यात त्यानं 7 षटकारही लगावले.

धोनीचे शतक लकी

Loading...

धोनीनं सराव सामन्यात दुसऱ्यांदा शतक ठोकले आहे. याआधी त्यानं 2011 साली सुध्दा 62 चेंडूत शतकी खेळी केली होती. दरम्यान बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही धोनीनं 73 चेंडूत शतकी खेळी केली. 2011 साली भारतानं विश्वजेतेपद जिंकले होते. त्यामुळं यंदाही इतिहासाची पुनरावृत्ती होते का ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा-World Cup : विराटपुढे धर्मसंकट ! कोणत्या 11 खेळाडूंना मिळणार दक्षिण आफ्रिकेविरोधात संधी

वाचा-World Cup : विराटसेनेची कमाल! एकही सामना न खेळता पोहचला 7व्या क्रमांकावर, 'हे' आहे कारण

वाचा- भारतीय क्रिकेटपटूची डोपिंग चाचणी, वर्ल्ड कपमधला 'असा' एकमेव खेळाडू


CET परीक्षेचा आज निकाल, यासोबतच इतर महत्त्वाचा 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 01:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...