World Cup : निवृत्ती संदर्भात पहिल्यांदाच बोलला धोनी, म्हणाला...

World Cup : निवृत्ती संदर्भात पहिल्यांदाच बोलला धोनी, म्हणाला...

श्रीलंका सामन्याआधी धोनी निवृत्त होणार अश्या बातम्या आल्या होत्या, मात्र धोनीनं निवृत्तीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

लीडस, 06 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारत आज श्रीलंकेविरोधात लीग स्टेजमधला शेवटचा सामना खेळणार आहेत. मात्र या सामन्याआधी सगळीकडे चर्चा रंगली आहे ती धोनीच्या निवृत्तीची. भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीनं निवृत्ती घ्यावी, त्याच्यात पुर्वीसारखा खेळ राहिला नाही अशी टीका सर्वच स्तरातून होत आहे. त्यातच पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कप 2019 हा धोनीचा शेवटचा विश्वचषक असेल अश्या बातम्या आल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं, "धोनी कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो. त्यानं देशासाठी खुप केलं आहे. याआधी त्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता कारण त्याला फलंदाजीवर लक्षकेंद्रित करायचे होते. सध्या वर्ल्ड कपमध्ये त्याचा फॉर्म चांगला आहे त्यामुळं तो निवृत्ती जाहीर करू शकतो", असा गौप्यस्पोट केला होता. यावर धोनीनं प्रतिक्रिया दिली नव्हती.

दरम्यान एबीपी न्यूज चॅनलच्या एका पत्रकारानं धोनीला निवृत्ती संर्दभात विचारले असता त्यानं आपल्या या वृत्ताला साफ खोडून काढले. धोनीनं आपल्या निवृत्तीवर, "लोकांना वाटतं मी श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळण्याआधीच निवृत्त व्हावे. मात्र मी कधी निवृत्त होणार हे मलाही माहित नाही", अशी प्रतिक्रिया दिली.

फॅन्सच्या निशाण्यावर धोनी

महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कपमध्ये सध्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. इंग्लंड विरोधात त्यानं 31 चेंडूत 42 धावा केल्या होत्या, त्यामुळं त्याला ट्रोल करण्यात आले होते. त्याच मैदानावर बांगलादेशविरोधात धोनीनं 33 चेंडूत 35 धावा केल्या, यात चार चौकारांचा समावेश होता. फॅन्सच्या म्हणण्यानुसार धोनी फिनीशर म्हणून खेळत नाही. त्यामुळं त्याला ट्रोल करण्यात आले होते.

सचिननं याआधी केली होती टिका

अफगाणिस्तान विरोधात भारताच्या फलंदाजीवरून सचिन तेंडुलकरनं धोनीवर टिका केली होती. सचिननं धोनीनं चेंडू खुप खाल्ले म्हणून टिका केली होती. यावरून धोनी आणि सचिनच्या चाहत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यानंतर सचिननं धोनीची पाठराखण करत तो चांगली फलंदाजी करत आहे असे मत व्यक्त केले होते. तर, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने, "धोनीला माहित आहे कसे खेळायचे, त्यामुळं त्याच्या खेळीवर बोलू नका", असे उत्तर दिले होते.

मलिंगा म्हणतो धोनीचं उत्तम फिनिशर

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगानं धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केले होते. मलिंगा म्हणाला की, धोनीनं अजून एकदोन वर्ष खेळायला हवं. त्यानं त्याच्यासारखे खेळाडू तयार करायला हवेत जे फिनिशर असतील. तो आजही क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फिनिशर आहे. त्याची जागा घेणं कठीण आहे".

वाचा-  'धोनीनं निवृत्ती घेऊ नये, तो अजुनही सर्वोत्तम फिनिशर'

वाचा- World Cup 2019 मध्ये रोहितच हिटमॅन, पाहा टॉप 5 फलंदाज!

वाचा- 'हिटमॅन' रोहितकडे World Cupमधील सर्वात मोठा विक्रम करण्याची गोल्डन संधी!

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 12:51 PM IST

ताज्या बातम्या