World Cup : 'गुप्टिल आता कळालं का, रन आऊट झाल्यावर कसं वाटतं'

World Cup : 'गुप्टिल आता कळालं का, रन आऊट झाल्यावर कसं वाटतं'

गुप्टिलच्या ओव्हर थ्रोमुळं न्यूझीलंडचे वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले.

  • Share this:

लंडन, 15 जुलै: श्वास रोखून ठेवणाऱ्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये अधिक चौकाराच्या जोरावर बाजी मारली. केवल वर्ल्ड कपच नव्हे तर वनडे क्रिकेटच्या इतिहासात असा सुपरहीट सामना झाला नसले. या सामन्यात अनेक थरारक घटना घडल्या. निर्धारीत 50 षटकात सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये देखील पुन्हा तो टाय झाला. अखेर इंग्लंडने अधिक चौकार कोणी मारले यावर बाजी मारली आणि पहिल्यांदा विजेतेपद मिळवले. या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती सुपर ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर मार्टिन गुप्टिल धावबाद झाल्याच्या घटनेची... गुप्टिल धावबाद झाला यावर सर्वाधिक चर्चा केली ती भारतीय चाहत्यांनी. गुप्टिलच्या एका थ्रो मुळेच भारताचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले होते. सेमीफायनलमध्ये गुप्टीलने धोनीला धावबाद करुन भारताचा पराभव केला होता. त्याच गुप्टिलला न्यूझीलंडला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठीची धाव घेत आला नाही आणि तो धावबाद झाला. भारतीय चाहत्यांनी गुप्टिलला धोनीला धावबाद केल्याच्या क्षणाची आठवण करून दिली.

भारताविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये अखेरच्या षटकांमध्ये गुप्टिलने धोनीला धावाबाद केले होते. धोनी धावबाद झाल्याने भारतीय संघाचे आव्हान संपुष्ठात आले. या घटनेनंतर गुप्टिलच्या थ्रोची चर्चा सर्व क्रिकेट जगतात होती. धोनीचे धावाबाद होणे ही क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असल्यासारखी वाटू लागली. योगायोग म्हणजे रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात गुप्टिल सोबत अशीच घटना घडली जशी धोनी सोबत झाली होती.

सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयासाठी 2 धावांची गरज होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणारा गुप्टिल धावबाद झाला. सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाल्याने सर्वाधिक चौकार आणि षटकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले.

या योगायोगावर भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर गुप्टिलला धोनीला धावबाद केल्यानंतर काय वाटलं याची आठवण करुन दिली.

VIDEO: चांद्रयान-2 का झेपावलं नाही, पाहा खरं कारण!

First published: July 15, 2019, 1:33 PM IST

ताज्या बातम्या