World Cup : दिग्गजांनी कौतुक केलं मात्र पाकने त्याला ठेवलं पाणी द्यायला!

World Cup : दिग्गजांनी कौतुक केलं मात्र पाकने त्याला ठेवलं पाणी द्यायला!

ICC Cricket World Cup : पाकिस्तानकडे 19 वर्षांचा हुकमी एक्का असताना त्यांनी एकाही सामन्यात त्याला संधी दिली नाही.

  • Share this:

लंडन, 05 जुलै : ICC Cricket World सुरू होण्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनची चर्चा सुरू होती. पाकचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर, संघाची निवड करणारा प्रमुख इंजमाम उल हक यांनी त्याच्या वेगाचं कौतुक केलं होतं. हसनैन संघाचा हुकमी एक्का असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याला शेवटपर्यंत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. फक्त संघ सहकाऱ्यांना पाणी, कोल्ड्रिंक्स देण्याचं काम त्याला दिलं.

बांगलादेशविरुद्ध पाकचा शेवटचा सामना होता. त्यांचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. या सामन्यात मोठ्या विजयाची गरज होती. मोठी धावसंख्या उभारून त्यांना विजय मिळवता आला असता. याआधीच्या सामन्यात हसनैनला घेतलं असतं तर कदाचित ते सेमीफायनलला पोहचू शकले असते.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हैदराबाद शहरातला असलेल्या हसनैन 2015 मध्ये पाकिस्तानच्या अंडर 15 संघातून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तेव्हा नेट प्रॅक्टिसमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉला त्याची गोलंदाजी आवडली होती. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीगही हसनैननं गाजवली होती. त्याने लीगमध्ये 12 विकेट घेत संघाला विजेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पीएसएलच्या अंतिम सामन्यात 3 विकेट घेणाऱ्या हसनैनला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. पीएसएलमध्ये अंतिम सामन्यात हा पुरस्कार पटकावणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला होता. त्याच्या आधी पाकिस्तान बाहेरील खेळाडूंनीच अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवला होता. हसनैननं याच स्पर्धेत 151 किलोमीटर प्रतितास वेगानं चेंडू टाकला होता. याच वेगानं मिकी ऑर्थर यांचं लक्ष वेधून घेतंल होतं.

वर्ल्ड कपच्या आधी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी हसनैनची संघात निवड झाली. त्याने सराव सामन्यात दोन फलंदाजांना बाऊन्सरचे दणके दिले होते. पहिल्या बाऊन्सरवर हेल्मेट तुटलं आणि फलंदाजाला मैदानही सोडावं लागलं होतं. त्यानंतर पुढच्या षटकांत आणखी एका फलंदाजाला हसनैनने बाऊन्सर टाकला. तेव्हा फिजिओंनी मैदानात येऊन फलंदाजाची तपासणी केली होती.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसनने हसनैनच्या वेगाचं कौतुक केलं होतं. 18 वर्षाच्या मुलाला इतक्या वेगानं गोलंदाजी करताना कधीच पाहिलं नव्हतं. लेंथ आणि स्विंग या दोन्हीवर त्याची पकड आहे असंही वॉटसनने म्हटलं होतं.

World Cup : श्रीलंकेविरोधात बुमराह खेळण्याची शक्यता कमी, कोण घेणार जागा?

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

First published: July 5, 2019, 8:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading