World Cup : पाक खेळाडूची चाहत्यांना विनंती, 'शिव्या देऊ नका, आम्ही पुन्हा जोमानं खेळू'

क्रिकेट टीमला माती खावी लागल्यानं पाकिस्तानच्या फॅन्सचा तीळपापड होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 09:09 AM IST

World Cup : पाक खेळाडूची चाहत्यांना विनंती, 'शिव्या देऊ नका, आम्ही पुन्हा जोमानं खेळू'

मॅंचेस्टर, 18 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारत-पाकिस्तान या हायवोल्टेज सामन्यात भारतानं पाकिस्तानला नमवलं. यापूर्वी भारतानं पाकिस्तानला 1992च्या वर्ल्ड कपमध्ये 43 धावांनी, 1996 साली 39 धावांनी, 1999 मध्ये 47 धावांनी, 2003 मध्ये 6 विकेट्सने, 2011मध्ये 29 धावांनी आणइ 2015 मध्ये 76 धावांनी पराभूत केले होते.

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज खान यानं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पाकिस्तानला महागात पडला कारण पहिल्या विकेटसाठी रोहत शर्मा आणि केएल राहुल यांनी तब्बल 136 धावांची भागिदारी केली. यात दोन्ही खेळाडूंच्या अर्धशतकांचा समावेश होता. त्यामुळं पाकिस्तानच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर तबाव टाकता आला नाही. त्यातच ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळं तब्बल तीनवेळा रनआऊटची संधी हुकली. त्यामुळं भारतीय संघानं 336 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, पाकिस्तानच्या फलंदाजांना हे आव्हान पार करता आले नाही.

पाकिस्तानच्या पराभवानंतर, पाकच्या चाहत्यांमध्ये मातम सुरू झाला. क्रिकेट टीमला माती खावी लागल्यानं पाकिस्तानच्या फॅन्सचा तीळपापड होत आहे. पाकमधील एका आजीने सर्फराजसह पाक टीमवर नाराजी व्यक्त करत चांगलं फटकारून काढलं आहे. यावरुन पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिर यांन चाहत्यांना विनंती केली आहे.

आमिरनं आपल्या चाहत्यांना, "आम्हाला शिव्या घालू नका. तुम्हा आमच्या खेळीवर आम्हाला बोलू शकता पण अपशब्द वापरू नका. आम्ही देशासाठी खेळतो, पुन्हा जोमानं आम्ही खेळू", अशी विनंती ट्विटरवरून केली आहे.



सर्फराज बिनडोक कर्णधार

पाकिस्तानच्या खेळाडूंच्या या सगळ्या स्थितीवर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर यानं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज खान याला जबाबदार ठरवले आहे. शोएरबनं आपल्या यु-ट्युब चॅनलवरुन भारत-पाकिस्तान सामन्यावर भाष्य केलं आहे. शोएबच्या मते पाकिस्ताननं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतले पाहिजे होता. त्यानं, भारतीय संघाविरोधात पाकिस्तानच्या संघानं एवढ्या वर्षात कधी आव्हानाचा पाठलाग करता आलेला नाही. त्यामुळं सफराजनं आपलं डोक चालवायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया दिली. शोएबनं या व्हिडिओमध्ये, "आमची मॅनेजमेंट पागल आहे आणि आमचा कर्णधार मामू बनला आहे. त्याला काही कळत नाही. तो म्हणजे 10वीच्या वर्गातला मुलगा आहे, त्याला बाकी जे सांगतील तेवढेचं तो करतो'', अशी जहरी टीका केली आहे.


वाचा- सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही'

वाचा- पुन्हा बांगलादेशचा संघ ठरला जायंट किलर, वेस्ट इंडिज विरोधात केले 'हे' रेकॉर्ड

वाचा- World Cup : आमचा कर्णधार बिनडोक, शोएबची सर्फराजवर जहरी टीका


लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 09:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close