World Cup : 'तुम्ही काहीही म्हणा भगव्या जर्सीमुळेच भारत हरला', माजी मुख्यमंत्र्यांचा अजब दावा

World Cup : 'तुम्ही काहीही म्हणा भगव्या जर्सीमुळेच भारत हरला', माजी मुख्यमंत्र्यांचा अजब दावा

सध्या भारत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे, सेमीफायनल प्रवेश करण्यासाठी विराटसेनेला एक विजयाची गरज आहे.

  • Share this:

बर्मिंगहम, 1 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारत- इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात विराटसेनेला पराभवाचा पहिला धक्का बसला. सलग पाच सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयरथाला इंग्लंडने ब्रेक लावला आहे. या पराभवाने भारताचा सेमीफायनल प्रवेश लांबला आहे. 7 पैकी 5 सामने जिंकून भारताने 11 गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करणाऱ्या भारताला इंग्लंडविरुद्ध मात्र पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत आतपर्यंत एकही सामना न गमावलेल्या भारताला इंग्लंडने पराभूत करून सेमीफायनलच्या दिशेन एक पाऊल टाकलं आहे.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं भारतासमोर 337 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं हा सामना 31 धावांनी गमावला. भारताच्या पराभवामुळं चाहते फलंदाजांवर नाराज आहेत. इंग्लंडनं फलंदाजी करताना तब्बल 13 षटकारांचा वर्षाव केला. मात्र, भारताला आपल्या 50 ओव्हरमध्ये केवळ एक षटकार मारता आला. शेवटच्या ओव्हरमध्ये महेंद्रसिंग धोनीनं हा षटकार मारला. तर, इंग्लंजकडून बेअरस्टोनं 6, स्टोक्सनं 3 तर, जेसन रॉय आणि बटरल यांनी 2-2 षटकार लगावले. भारताकडून रोहित शर्मानं शतकी खेळी केली तर, विराट कोहलीनं 66 धावा केल्या. मात्र भारताच्या मधल्या फळीला चांगली फलंदाजी करता आली नाही. हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी यांची भागिदारी भारताला सामना जिंकून देईल असे वाटत असतानाच पांड्या बाद झाला. त्यामुळं चाहत्यांना भारताच्या मधल्या फळीवर चाहत्यांना ताशेरे ओढले आहेत.

यातच आता जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी भारतीय संघाच्या विजायाचे प्रमुख कारण सांगितले आहे. इंग्लंड विरोधात मिळालेल्या पराभवानंतर मुफ्ती यांनी ट्विट करत, " तुम्ही मला अंधश्रध्दाळू म्हणा पण भगव्या जर्सीमुळंच भारत हरला आहे", असा अजब दावा केला आहे. याआधी समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांनी भगव्या जर्सीवरून विरोध केला होता.

वर्ल्ड कपमध्ये भारत सध्या 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी एक सामना जिंकण्याची गरज आहे. भारताच्या पराभवामुळं विराटसेनेला विशेष फरक पडला नसला तरी, पाकिस्तान आणि बांगलादेश संघासाठी सेमीफायनल गाठणे कठिण झाले आहे.

वाचा- 'तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग'; रोहितनं केली बोलती बंद

वाचा- World Cup: विराट कोहलीने रचला इतिहास; अर्धशतकी खेळीने कर्णधारांमध्ये झाला बाप!

वाचा- World Cup : पहिल्या 20 ओव्हरमध्येच हरला होता भारत, हा घ्या पुरावा

पावसाचा अंदाज ते World Cup अपडेट, या आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 11:18 AM IST

ताज्या बातम्या