इंग्लंडसाठी फायद्याचा ठरलेला ओव्हर थ्रोचा नियम बदलणार?

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ओव्हर थ्रोची एक धाव अधिक दिल्यानं सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना टाय झाला होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 09:53 AM IST

इंग्लंडसाठी फायद्याचा ठरलेला ओव्हर थ्रोचा नियम बदलणार?

लॉर्ड्स, 13 ऑगस्ट : ICC Cricket World Cupमध्ये अंतिम सामन्याचा निकाल सुपर ओव्हरवर ठरला होता. पहिल्यांदा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यातही पुन्हा टाय झाल्यावर चौकार-षटकारांच्या जोरावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. यानंतर आयसीसीच्या नियमावर टीका करण्यात आली. दरम्यान, इंग्लंडच्या शेवटच्या षटकात ओव्हर थ्रोवर पंचांनी दिलेल्या धावांची चर्चाही झाली. ओव्हर थ्रोच्या नियमावरही क्रिकेटप्रेमींनी टीका केली होती.

ओव्हर थ्रोचा हा नियम आता बदलण्याची शक्यता आहे. याबाबत एमसीसीनं म्हटलं आहे की, ओव्हर थ्रोच्या नियमाची सप्टेंबर महिन्यात समीक्षा करण्यात येईल. वर्ल्ड क्रिकेट समितीनं ओव्हर थ्रोच्या नियम 19.8 बद्दल चर्चा केली होती. त्यांना वाटतं की नियम योग्य आहे. पण या प्रकरणी लॉ सब कमिटी सप्टेंबरमध्ये समीक्षा करणार आहे.

वर्ल़्ड कपच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात तीन चेंडूत इंग्लंडला 9 धावांची गरज होती. तेव्हा डीप मिडविकेटवरून गुप्टिलनं केलेला थ्रो बेन स्टोक्सच्या बॅटला लागून चौकार गेला. त्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी दुसरे पंच इरासमुस यांच्याशी चर्चा करत, इंग्लंडला सहा धावा दिल्या. यात दोन धावा खेळाडूंनी धावत काढल्या तर, चार धावा ओव्हरथ्रोच्या मिळाल्या. या सहा धावांमुळं 242 धावांचा पाठलाग करणारा इंग्लंड 241 धावा करू शकला. त्यामुळं हा सामना टाय झाला.

'सहा नाही पाचच धावा'

ओव्हर थ्रोच्या धावा देताना पंचांकडून चुक झाल्याचं माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टफेल यांनीही म्हटलं. ओव्हर थ्रोवर सहा धावा नाही तर पाच धावाच द्यायला हव्या होत्या असंही स्पष्ट केलं. टफेल यांच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट प्रेमींनी आयसीसीनं पुन्हा विचार करावा आणि अजुनही वेळ गेलेली नाही असं म्हटलं आहे.

Loading...

ओव्हर थ्रोसाठी नियम

ओव्हर थ्रोसाठी आयसीसीनं दिलेल्या 19.8 नियमानुसार जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूमुळं जर चेंडू सीमापार गेला तर, त्याचा फायदा दुसऱ्या संघाला होतो. मात्र जर, फलंदाजानं थ्रो करण्याआधी धाव पूर्ण केली नसेल तर, एक अतिरिक्त धाव फलंदाजाला मिळत नाही. त्यामुळं जेव्हा गुप्टिलनं थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स क्रिजमध्ये नव्हता. त्यामुळं दोन रन ऐवजी केवळ एक धाव देणे गरजेचे होते. त्यामुळं पंचाच्या एका चूकीमुळं न्यूझीलंडला वर्ल्ड कप गमवावा लागला.

VIDEO: लवासा सिटीमुळे निसर्गाचा मुडदा पडला, महापुरावर बोलताना संभाजी भिडेंना अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...