IND vs SL : कोहलीचा एक निर्णय मोडणार 32 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड!

विजय शंकर वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर त्याच्याजागी मयंक अग्रवालला संघात सामिल करण्यात आले आहे, त्यामुळं आज तो खेळणार की हे पाहावे लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 02:01 PM IST

IND vs SL : कोहलीचा एक निर्णय मोडणार 32 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड!

लीडस, 06 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये आज भारतीय संघ श्रीलंकेविरोधात भिडणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं /याआधी सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठण्यासाठी भारतीय संघाला श्रीलंकेला पराभूत करावे लागणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात विराट कोहलीकडे आपल्या संघात काही बदल करण्याची संधी आहे, कारण याचा फायदा भारताला सेमीफायनलच्या सामन्यात होऊ शकतो. विजय शंकर वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर त्याच्याजागी मयंक अग्रवालला संघात सामिल करण्यात आले आहे, त्यामुळं आज तो खेळणार की हे पाहावे लागणार आहे.

श्रीलंकेविरोधात आज विराट मयंक अग्रवालला संघात स्थान देऊ शकतो. दरम्यान आजच्या सामन्यात 11 खेळाडूंमध्ये मयंकला सामिल केल्यास त्याला 32 वर्षांपूर्वीचा नवज्योत सिंग सिध्दू यांचा विक्रम मोडण्याची संधी मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वर्ल्ड कप संघात सामिल करण्यात आलेल्या मयंकनं आतापर्यंत एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. त्यामुळं आज त्यानं सामना खेळल्यास मयंक एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपले पदार्पण करू शकतो.

27 वर्षांनंतर मिळणार संधी

श्रीलंकेविरोधात मयंकला संधी मिळाल्यास वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणारा खेळाडू होणार आहे. दरम्यान वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणारा तो सातवा भारतीय खेळाडू असेल. त्याचबरोबर 27 वर्षांनंतर भारतीय खेळाडू वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे.

1987मध्ये वर्ल्ड कपमध्ये सिध्दूनं केले होते पदार्पण

Loading...

1987-88च्या वर्ल्ड कपमध्ये फलंदाज नवज्योत सिंग सिध्दूनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात 79 चेंडूत 73 धावा केल्या होत्या. यात 4 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. मात्र या सामन्यात भारताला 1 विकेटनं पराभूत व्हावे लागले होते. त्याचबरोबर 1991-92मध्ये ऑलराऊंडर अजय जडेजानं पदार्पण केले होते.

1975मध्ये 3 खेळाडूंनी केले होते पदार्पण

1975च्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या तीन खेळाडूंनी पदार्पण केले होते. अंशुमान गायकवाड, मोहिंदर अमरनाथ आणि करसन घावरी यांनी पहिल्या सामन्यात पदार्पण केले होते. दरम्यान आज मयंक अग्रवालनं पदार्पण केल्यास तो सातवा खेळाडू ठरू शकतो.

वाचा-  'धोनीनं निवृत्ती घेऊ नये, तो अजुनही सर्वोत्तम फिनिशर'

वाचा- World Cup 2019 मध्ये रोहितच हिटमॅन, पाहा टॉप 5 फलंदाज!

वाचा- 'हिटमॅन' रोहितकडे World Cupमधील सर्वात मोठा विक्रम करण्याची गोल्डन संधी!

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 01:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...