World Cup : पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

World Cup : पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

ICC Cricket World Cup 2019 : हार्दिक पांड्याने फलंदाजी करताना 38 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना सुनिल अॅम्ब्रिसला बाद केलं.

  • Share this:

मँचेस्टर, 27 जून : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही कमाल केली. फलंदाजी करताना त्याने भारताकडून वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात सर्वात जास्त स्ट्राईक रेटनं धावा केल्या. त्याने 38 चेंडूत 46 धावा करताना 5 चौकार मारले. कॉट्रेलच्या गोलंदाजीवर पांड्या झेलबाद झाला. त्यानंतर कॉट्रेलनं त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं सॅल्युट करत विकेट मिळाल्याचा जल्लोष केला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना कोहली आणि धोनीच्या अर्धशतकांच्या जोरावर 7 बाद 268 धावा केल्या. त्यानंतर भारताने गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला लवकर बाद केलं. वर्ल्ड कपमधील पदार्पणाच्या सामन्यातच हॅट्ट्रिक घेणाऱ्या शमीने वेस्ट इंडिजचे दोन फलंदाज बाद केले. त्यानंतर हार्दीक पांड्याने रसेलच्या जागी संघात आलेल्या सुनिल अॅम्ब्रिसला बाद केलं. तेव्हा पांड्याने मैदानावर बसून टाळ्या वाजवत विकेट घेतल्याचा जल्लोष केला.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची 27 षटकात 7 बाद 107 अशी अवस्था झाली होती. भारताच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. शमीनं सलामीच्या फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर पांड्याने अॅम्ब्रिसला आणि कुलदीप यादवने निकोलस पूरनला बाद केलं. चहलने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. बुमराहने ब्रेथवेट आणि अॅलनला सलग दोन चेंडूवर बाद केले.

नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 268 धावा केल्या. विराट कोहली वगळता इतर फलंदाज वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर फार काळ टिकू शकले नाहीत. सलामीवीर रोहित शर्मा फक्त 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव सावरला. पण राहुल बाद झाल्यानंतर विजय शंकरसुद्धा 14 धावांवर बाद झाला. विजय शंकरनंतर केदार जाधव धोनीच्या आधी फलंदाजीला आला. तो फक्त 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या धोनीची सुरुवात अडखळत झाली. त्याला 8 धावांवर असताना जीवदान मिळाले.

World Cup : भारतासमोर चौथ्या क्रमांकाचा पेच, रिषभ पंतला संधी द्यावी?

वाचा- सामन्याआधीच भारतानं इंग्लंडला दिला दणका, हिसकावून घेतले पहिले स्थान

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 10:02 PM IST

ताज्या बातम्या