लंडन, 11 जून : भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलु खेळाडू मार्कस स्टोइनिससुद्धा दुखापतग्रस्त झाला आहे. भारताविरुद्ध स्टोइनिसने विराट आणि धोनीला बाद केलं होतं. फलंदाजीत मात्र त्याला कमाल करता आली नव्हती. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर तो शून्यावर बाद झाला होता.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली आहे. स्टोइनिसच्या जागी ऑस्ट्रेलिया संघात मिशेल मार्शला संधी देण्यात येणार आहे. मार्श बुधवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.
सध्या मिशेल मार्शचे नाव ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप संघात नाही. आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी दुसरा खेळाडू खेळू शकतो. पण पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर त्याला पुन्हा संघात घेता येणार नाही.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी टॉटनच्या काउंटी ग्राउंडवर सामना होणार आहे. त्यानंतर पाकिस्तानचा सामना भारताशी 16 जूनला रविवारी होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक साजरं करणारा भारताचा सलामीवीर शिखर धवनसुद्धा बाहेर पडल्यानं एकप्रकारे पाकिस्तानसाठी या खेळाडूंची दुखापत जमेची बाजू ठरू शकते.
वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर
वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट
पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा