World Cup : केएल राहुलच्या एका शतकामुळं होणार 'या' तीन खेळाडूंचा पत्ता कट

केएल राहुलला संघात राखीव सलामीवीर म्हणून घेतले असले तरी, बांगलादेश विरोधात त्यानं 99 चेंडूत 108 धावांची खेळी केली.

News18 Lokmat | Updated On: May 28, 2019 09:53 PM IST

World Cup : केएल राहुलच्या एका शतकामुळं होणार 'या' तीन खेळाडूंचा पत्ता कट

वर्ल्डकपला केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला असताना, विराटला मात्र भारताच्या फलंदाजीची चिंता सतावत होती. मात्र आता केएल राहुलच्या शतकी खेळीमुळं विराटची ही चिंता मिटली आहे. बांगलादेश विरोधात झालेल्या सराव सामन्यात राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीकरिता उतरला होता.

केएल राहुलला संघात राखीव सलामीवीर म्हणून घेतले असले तरी, बांगलादेश विरोधात त्यानं 99 चेंडूत 108 धावांची खेळी केली. या खेळीत त्यानं 12 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट 109.09 होता. त्यामुळं आता चौथ्या क्रमांकाची चिंता मिटली आहे.

मात्र, केएल राहुलच्या या शतकी खेळीमुळं भारतीय संघातील तीन खेळाडूंना धक्का बसणार आहे. यातील पहिला खेळाडू आहे, विजय शंकर. विजय शंकरला संघात चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून घेतले होते. मात्र बांगलादेशविरोधात त्याला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं त्याचा पत्ता कट होण्याच्या मार्गावर आहे.

Loading...

विजय शंकरनंतर नंबर लागतो तो, पुणेकर केदार जाधव याचा. केदार जाधव दुखापतग्रस्त असल्यामुळं दोन्ही सराव सामन्यांना तो मुकला, त्यामुळं त्याला वर्ल्डकपलाही मुकावे लागण्याची शक्यता आहे.

त्यानंतर दिनेश कार्तिकचा नंबर लागतो. दिनेश कार्तिकचे संघात स्थान  तसेही निश्चित नाही. कारण त्याला राखीव यष्टीरक्षक म्हणून स्थान देण्यात आले होते. त्यामुळं धोनीच्या अनुपस्थितीत त्याला संघात स्थान मिळणार आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात राहुलनं धोनीसोबत 104 धावांची भागीदारी करत, भारताला 300चा आकडा पार करुन दिला. त्याच्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीवर कर्णधार विराट कोहली भलताच खुश झालेला दिसला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 09:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...