World Cup : केएल राहुलच्या अडचणी वाढल्या, चौथ्या क्रमांकाचा ‘हा’ दावेदार झाला फिट

World Cup : केएल राहुलच्या अडचणी वाढल्या, चौथ्या क्रमांकाचा ‘हा’ दावेदार झाला फिट

भारताचा पहिला सामना साऊथ आफ्रिकेविरोधात 5 जून रोजी होणार आहे.

  • Share this:

लंडन, 03 जून : आयसीसी वर्ल्ड कपमध्ये सध्या भारतीय संघाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दरम्यान भारतानं आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही, भारताचा पहिला सामना साऊथ आफ्रिकेविरोधात 5 जून रोजी होणार आहे. दरम्यान साऊथ आफ्रिकेसाठी हा सामना करो वा मरोचा सामना असणार आहे. कारण साऊथ आफ्रिकेच्या संघानं न्युझीलंड आणि बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात मानहानीकारक पराभव मिळवला. त्यामुळं भारताविरोधात सामना गमावल्यास त्याचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येऊ शकते.

दरम्यान भारतीय संघासाठी मधली फळी हा चिंतेचा विषय होता, मात्र आता तोही प्रश्न सुटला आहे असे वाटले असताना, विराटच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत. बांगलादेश विरोधात झालेल्या सराव सामन्यात केएल राहलुनं चौथ्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजी करत शतकी खेळी केली. या त्याच्या खेळीच्या जोरावर त्यानं संघातील आपले स्थान पक्के केले असे वाटत असताना, आता ते स्थान धोक्यात आले आहे.

खांद्याच्या दुखापतीमुळं सराव सामन्या संघाबाहेर असलेला केदार जाधन यानं रविवारी नेट प्रॅक्टीसमध्ये सहभाग घेतला. दरम्यान साऊथ आफ्रिकाविरोधात होणाऱ्या पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळणार का, याबाबत साशंकता आहे. केदार जाधवनं न्युझीलंड आणि बांगलादेश यांच्या विरोधात झालेल्या सराव सामन्यात सामिल नव्हता झाला. त्यामुळं त्याला पहिल्या सामन्यात संधी मिळणार नसली तरी, तो फिट झाल्यामुळं केएल राहुलच्या अडचणी वाढू शकतात. आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणाऱ्या केदार जाधवला दुखापत झाली होती,त्यामुळं आयपीएलमधले क्वालिफायर सामने तो खेळू शकला नव्हता. त्यामुळं संघातील त्याचे स्थान निश्चित नव्हते. आता मात्र केदार जाधव फिट झाल्यामुळं केएल राहुलच्या अडचणी वाढल्या आहेत.

सामन्याआधी रविवारी विराट कोहली, केदार जाधव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, भुवनेश्वर कुमार आणि विजय शंकर यांनी जिममध्ये एकत्र व्यायाम केला. यावेळीही केदार जाधव फिट दिसत होता, त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कोहलीच्या दुखापतीमुळं चिंता वाढल्या

याआधी सरावादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळं भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. सरावा दरम्यान, टीमचे फिजीओ पैट्रीक फहर्ट विराट कोहलीच्या अंगठ्याला पट्टी बांधताना दिसले. त्यामुळं साउथ आफ्रिकेविरोधात सामन्याला केवळ 2 दिवस उरले असताना, विराटची ही दुखापच सर्वांचीच धाकधूक वाढवणारी आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळं विराट कोहलीच्या या दुखापतीबाबत चाहत्यांना अंदाज बांधता येत नाही आहे.

वाचा-  World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

वाचा- World Cup : तब्बल सातवेळा कागदावर कमकुवत वाटणारे संघ ठरले जायंट किलर !

वाचा- World Cup : बांगलादेशी वाघांसमोर आफ्रिकेची शरणागती, काय आहेत कारणं?

VIDEO : 'उदयनराजे तुम्ही आमच्यासाठी वंदनीय, पण पुरंदरेंना आम्ही...', संभाजी ब्रिगेड आक्रमक

First published: June 3, 2019, 9:39 AM IST

ताज्या बातम्या