News18 Lokmat

World Cup : ...म्हणून 8 वर्षांआधीच हार्दिक पांड्यानं केलं वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन, फोटो झाला व्हायरल

भारत जेव्हा 2011चा विश्वचषक जिंकला तेव्हा हार्दिक पांड्या केवळ 17 वर्षांचा होता. त्यानंतर आठ वर्षांनी तो चक्क भारताचा मॅच विनर खेळाडू बनला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 11:48 AM IST

World Cup : ...म्हणून 8 वर्षांआधीच हार्दिक पांड्यानं केलं वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन, फोटो झाला व्हायरल

लंडन, 25 मे : वर्ल्ड कप सुरु होण्याकरिता आता केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळं सर्व संघ जय्यत तयारी करित आहे. दरम्यान भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारताचा सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली यंदा पहिल्यांदाच विश्वचषकात उतरणार आहे, त्यामुळं विराटसेनेकडून सर्वांच्याच खुप अपेक्षा आहेत.

भारतानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 28 वर्षांचा दुष्काळ संपवत 2011 साली विश्वचषक जिंकले. तो क्षण आजही आपल्या सर्वांच्या मनात ताजा आहे. त्यामुळं यंदाही इंग्लंडच्या भुमित विराटनं आपली जादू दाखवावी अशी अपेक्षा चाहते करत आहेत. मात्र विराटसेनेत एक असा खेळाडू आहे, जो 2011च्या विश्वचषकात भारतीय संघात सामिल नसला तरी त्यानं आपल्या साथिदारांसोबत सेलिब्रेशन केले होते. हा खेळाडू आहे, भारताचा सर्वात विश्वासु आणि धडाकेबाज अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्यानं सोशल मीडियावर आपल्या या सेलिब्रशनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पांड्याचं हे रुप पाहून बसेल धक्का

भारतीय संघाचा धाकड अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. एखाद्या स्वप्नसारखं त्याचं क्रिकेट करिअर राहिलं आहे. त्यानं स्वप्नातही विचार केला नव्हता, परंतु आज जो भारताच्या विश्वचषक संघातला महत्त्वाचा खेळाडू आहे. हार्दिकनं ट्विटरच्या माध्यमातून दोन फोटो शेअर केले. यातील पहिला फोटो, 2011चा विश्वचषक जिंकल्यानंतर केलेले सेलिब्रेशन करतानाचा होता, तर दुसरा फोटो हार्दिकनं 2011चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, जसप्रीत बुमराह टाकला आहे. त्यात त्यानं माझं स्वप्न पुर्ण झालं असे लिहिले.


Loading...


टीमचा एकमेव स्टार फलंदाज

भारत जेव्हा 2011चा विश्वचषक जिंकला तेव्हा हार्दिक पांड्या केवळ 17 वर्षांचा होता. त्यानंतर आठ वर्षांनी तो चक्क भारताचा मॅच विनर खेळाडू बनला आहे. 2016मध्ये टी-20 सामन्यातून हार्दिकनं पदार्पण केले. 11 कसोटी सामन्यात त्यानं 532 धावा तर 17 विकेट घेतल्या आहेत. तर, 45 एकदिवसीय सामन्यात 731 धावा तर, 44 विकेट घेतल्या आहे. त्यामुळं इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकात हार्दिक पांड्याचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे. आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्यानं आक्रमक फलंदाजी केली होती.

वाचा-हिटमॅनने सांगितलं, 2011 च्या वर्ल्ड कप संघातून त्याला का वगळलं?

वाचा- वर्ल्ड कपसाठी विराटला हवा 'हा' परदेशी खेळाडू!

वाचा- World Cup : विराटचं टेंशन वाढलं, सामन्याआधीच महत्त्वाचा खेळाडू जखमी

वाचा- World Cup : ‘या’ खेळाडूमुळं वर्ल्ड कपआधी पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर


माजी आमदाराच्या कार्यक्रमात पैशांचा पाऊस, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2019 11:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...