लंडन, 26 जून :ICC Cricket World Cupमध्ये न्यूझीलंडनं जवळजवळ आपले सेमिफायनलचे स्थान निश्चित केले आहे. एवढेच नाही तर, गुणतालिकेत न्यूझीलंड सध्या अव्वल स्थानी आहे. यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने दमदार कामगिरी करत संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. आजही पाकिस्तानविरोधात प्रथम फलंदाजी करताना केननं 41 धावा केल्या. केननं 5 सामन्यात 414 धावा केल्या आहेत.
केन विलियम्सनसाठी यंदाचा वर्ल्ड कप खास ठरला तो त्याच्या वादळी फलंदाजीमुळं, मात्र आता केन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये केननं चक्क आपल्या बॅटलाच गिटार बनवले आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंतीही मिळत आहे.आयसीसीनं टाकलेल्या एका व्हिडिओमध्ये माईक विल्टन या संगीतकारासोबत केन गिटार वाजवताना दिसला. यावरून केनला संगीताची आवड असल्याचेही स्पष्ट होत आहे. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये केनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडनं चांगली कामगिरी केली आहे.
The sound off #KaneWilliamson's bat is music to the ears, but he took it to another level when he joined #CWC19 Cricketarist Mike Wilton with a @graynics 'bat'!pic.twitter.com/4qV0WyHwUk
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 25, 2019
सध्या पाकिस्तान विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजाची मदार केनवर आहे. तर, गोलंदाजीमध्ये लॉकी फर्ग्यूसन आणि ट्रेंट बोल्ट हे दोन गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत. दोघांनी आातापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. जिम्मी निशाम, रॉस टेलर आणि मॅट हेनरी यांचे योगदान सुध्दा महत्त्वपुर्ण राहिले आहे. जिम्मी निशामनं पाकिस्तान विरोधात 97 धावांची तुफान खेळी केली.
वाचा- IND vs WI : अरे चाललयं काय, भारत वेस्ट इंडिज विरोधात खेळतचं नाहीये तर...
वाचा- सचिनला भारतीय संघात नको आहे शमी, हॅट्ट्रिक करूनही नाकारण्याचे 'हे' आहे कारण
वाचा- फलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या बुमराहच्या यॉर्कर मागचं 'हे' आहे रहस्य
अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी