लॉर्ड्स, 15 जुलै : न्य़ूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला ICC Cricket World Cup मध्ये मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. जेव्हा त्याचं नाव पुकारलं गेलं तेव्हा केन विल्यम्सनालसुद्धा धक्का बसला. विल्यम्सनने 10 सामनय्ात 578 धावा केल्या. यात त्यानं दोन शतकं आणि 5 अर्धशतकं केली. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये तो चौथ्या क्रमांकावर राहिला. त्यानं मालिकावीरच्या स्पर्धेत रोहित शर्मा, मिशेल स्टार्क आणि शाकिब अल हसनला मागे टाकलं.
विल्यम्सनला मालिकावीर पुरस्कार देताना सांगण्यात आलं की, त्यानं फक्त 578 धावा केल्या नाहीत तर एक कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडताना संघाला अंतिम फेरीत पोहचवलं. स्पर्धेत दोनवेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कारही त्यानं पटकावलं आहे. प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळं विल्यम्सन रोहित शर्मावर भारी पडला.
भारताचा हिटमॅन रोहित शर्माने 9 सामन्यात 5 शतके आणि एका अर्धशतकासह 648 धावा केल्या. एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्यानं केला. तसेच 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा रोहित शर्मानेच केल्या आहेत. मात्र भारताचे आव्हान सेमीफायनलमध्ये संपुष्टात आले.
क्रिकेटमध्ये फलंदाजांची कामगिरी दिसत असली तरी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने सर्वाधिक 27 विकेट घेतल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आहे. त्यानं 8 सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियालाच पराभूत करून इंग्लंड अंतिम फेरीत पोहचले होते.
वर्ल्ड़ कपमध्ये मालिकावीरच्या शर्यतीत बांगलादेशचा शाकिब अल हसन आघाडीवर होता. त्याने 8 सामन्यात 606 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीतही त्यानं 11 विकेट घेतल्या. बांगलादेशला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. विल्यम्सनच्या कामगिरीसमोर शाकिब अल हसन मागे पडला.
VIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा? भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट