धक्कादायक ! जोफ्रा आर्चरचा 'तो' बाऊन्सर ठरला साऊथ आफ्रिकन खेळाडूसाठी घातक

धक्कादायक ! जोफ्रा आर्चरचा 'तो' बाऊन्सर ठरला साऊथ आफ्रिकन खेळाडूसाठी घातक

वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात खतरनाक प्रकार. जोफ्रा आर्चरच्या 145 किमी वेगाचा बाऊंसर खेळाडूसाठी ठरला घातक.

  • Share this:

ओव्हल, 30 मे :जगभरातील क्रिकेटप्रेमी ज्या स्पर्धेची गेली पाच वर्ष वाट पाहत होते, त्या विश्वचषक स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिला सामना इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात ओव्हलच्या मैदानावर होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं पुन्हा एकदा 300चा आकडा पार केला. यजमानांनी पहिल्याच सामन्यात साऊथ आफ्रिकेसमोर 312 धावांचे आव्हान ठेवले.

दरम्यान या आव्हानाचा पाठलाग करताना, क्विंटन डी कॉक आणि हाशिम अमला यांनी संथ सुरुवात केली. दरम्यान जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या आव्होरमध्ये असा प्रकार घडला जो पाहून क्रिकेट चाहत्यांनाही हादरा बसला. जोफ्रा आर्चरच्या पाचव्या चेंडूवर त्यानं टाकलेला 145 किमी प्रती वेगाचा बाऊंसर अमलाच्या हेल्मेटवर लागला. या चेंडू एवढ्या जोरात लागला की, अमला खाली कोसळला आणि त्यानं हेल्मेट काढला. आर्चरनं अमलाची चौकशीही केली.

मात्र अमलाला झालेली मोठी दुखापत झाली असल्याची शक्यता आहे. कारण ते चेंडू लागल्यानंतर अमलानं लगेचच मैदान सोडले. त्यामुळं साऊथ आफ्रिकेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. याआधी त्यांचा जलद गोलंदाज डेल स्टेनही दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर आहे. अमला 5 धावांवर रेड हर्ट होऊन मैदानाबाहेर आहे, मात्र तो फलंदाजीकरिता कधीही उतरु शकतो. आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटच्या रॅंकीगनुसार इंग्लंडचा संघ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे तर, साऊथ आफ्रिकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2015च्या विश्वचषकानंतर इंग्लंड संघाने तब्बल 39वेळा 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. साऊथ आफ्रिकेनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.

इंग्लंड-साऊथ आफ्रिका आमने-सामने

या दोन्ही संघातील एकदिवसीय क्रिकेटमधले आकडे पाहिल्यास त्यांच्यात द्वंद्व युध्द दिसून येते. इंग्लंडनं साऊथ आफ्रिका विरोधात 59 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यातील 26 सामन्यात विजय मिळवता आला आहे तर, 29 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. इंग्लंडनं आपल्या घरच्या मैदानावर आफ्रिकेच्या संघाला 15वेळा नमवले आहे तर, 8वेळा पराभव पत्करला आहे.

वाचा- England vs South Africa : IPL गाजवणारा 'हा' खेळाडू ठरला गोल्डन डकचा मानकरी

वाचा- हा कसला वर्ल्ड कप, स्पर्धेतील बदलावर सचिन नाराज

वाचा- आपलंच नाव गुगलवर सर्च करतो हा खेळाडू, जडेजाने केला खुलासा

VIDEO : मोदींच्या शपथविधीला ममता राहणार अनुपस्थित; या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: May 30, 2019, 7:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading