World Cup : फलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या बुमराहच्या यॉर्कर मागचं 'हे' आहे रहस्य

World Cup : फलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या बुमराहच्या यॉर्कर मागचं 'हे' आहे रहस्य

भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप जिंकून देणार आहे, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क यांने केले होते.

  • Share this:

लंडन, 26 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ अपराजित संघ आहे, त्यामुळं सेमिफायनलमध्ये भारतीय संघाने जवळजवळ आपले स्थान निश्चित केले आहे. भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, 9 गुणांसह गुणतालिकेत सध्या तिसऱ्या क्रमांकालर आहे. भारतानं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांना नमवले आहे तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा खेळणाऱ्या भारतीय संघानं 5 जून रोजी आपला पहिला सामना खेळला होता. भारतानं इतर संघाच्या तुलनेत आतापर्यंत कमी सामने खेळले आहेत. त्यामुळे आता येत्या 10 दिवसांत भारतीय संघ 4 मुख्य सामने खेळणार आहे. याता आता गुरुवारी वेस्ट इंडिज विरोधात भारतीय संघ भिडेल. त्यामुळं येत्या 10 दिवसांत भारताचं विश्वचषकातलं भविष्य ठरणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी महत्त्वाचा ठरत आहे तो, भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह. बुमराह सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. मोहम्मह शमी आणि बुमराह यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतानं आपला विजयीरथ कायम ठेवला आहे. बुमराह म्हणजे अंतिम टप्प्यात फलंदाजांचा कर्दनकाळ, त्याचा यॉर्करहा फलंदाजांची झोप उडवतो. मात्र, बुमराहनं याच आपल्या यॉर्करबद्दल काही रंजक किस्से आणि रहस्य सांगितले आहे.

बीसीसीआयनं घेतलेल्या मुलाखतीत बुमराहनं, "मी लहानपणी जेव्हा सराव करायचो तेव्हा फक्त, यॉर्क चेंडू टाकायचो. तेव्हा मला फारसे काही कळायचे नाही. मला फक्त एवढे माहित होते की यॉर्कर टाकला की गोलंदाज बाद होतो. त्यामुळं मी फक्त त्याचा सराव करायचो. त्यामुळे माझ्या मनात असे समीकरणच तयार झाले की यॉर्कर चेंडू टाकले तरच बळी मिळतो", असे सांगितले. BCCI ने बुमराहची एक छोटीशी मुलाखत ट्विट केली आहे. या मुलाखतीत त्याने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तसेच बुमराहनं, "माझ्यासाठी माझे रॅकींग महत्त्वाचे नाही, संघाचा विजय महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात आम्हाला चांगली सुरुवात मिळाली, त्यामुळं लय कायम राखता आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधातही माझी रणनीती तीचं होती, त्याचा फायदा मला झाला", असेही या मुलाखतीत बुमराह म्हणाला.

याआधी भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकवण्यासाठी विराट कोहली किंवा रोहित शर्मा भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार नाही आहे. तर, भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप जिंकून देणार आहे. दरम्यान असा दावा केला आहे 2015च्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजयी संघाचा कर्णधार मायकल क्लार्क यानं. क्लार्कनं एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ''भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास त्याची चावी जसप्रीत बुमराहकडे असेल. बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल. बुमराहकडे कौशल्य आहे. तो तंदुरुस्त आहे.'', असे सांगितले.

माझी आई माझ्यासाठी सर्वकाही

माझे बाबा मी लहान असताना वारले त्यामुळं माझी आई माझ्यासाठी सर्वकाही आहे. माझ्यासाठी तीच प्रेरणा आहे. आम्ही घरी क्रिकेटबद्दल बोलत नाही. माझा दिवस चांगला नसतो, तेव्हा माझी बहिण आणि आई मला मदत करतात

आम्हाला मिळणारा सन्मान प्रेरणादायी

सध्या जलद गोलंदाजांना जो सन्मान मिळतो, ते पाहून आनंद होतो. माझ्या गोलंदाजीचे कौतुक जगभरातून होते, त्यामुळं मला आणखी चांगले खेळण्याची प्रेरणा मिळते. सध्या आम्ही संघांचा विचार करत आहोत, त्यामुळं आम्हाला सध्या सर्व सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा आहे.

वाचा- IND vs WI : अरे चाललयं काय, भारत वेस्ट इंडिज विरोधात खेळतचं नाहीये तर...

वाचा- इंग्लंडच्या पराभवाने तीन संघांना दिलासा, कोण गाठणार सेमीफायनल?

वाचा- World Cup : इंग्लंडचा पराभवाने पाकचा फायदा, दुसऱ्यांदा जग्गजेते होणार?

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

First published: June 26, 2019, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading