S M L

World Cup : विराटच्या चिंता मिटल्या, 'हा' भारतीय गोलंदाज करणार फलंदाजांची दांडी गुल

याआधी याच गोलंदाजांवर अनेकांनी त्याच्या अॅक्शनवरुन टीका केली होती.

News18 Lokmat | Updated On: May 27, 2019 07:59 PM IST

World Cup : विराटच्या चिंता मिटल्या, 'हा' भारतीय गोलंदाज करणार फलंदाजांची दांडी गुल

लंडन, 27 मे : आयसीसी विश्वचषकासाठी केवळ तीन दिवासांचा कालवधी उरला असताना, सध्या सर्व संघ जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान सध्या सुरु असलेल्या सराव सामन्यातून सर्वच संघाना आपल्या संघाची सद्यस्थिती कळत आहे. यातच विश्वचषकाला प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकण्यास सज्ज आहे. मात्र, भारतानं न्युझीलंड विरोधात झालेला पहिला सामना गमावला. या सामन्यात एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. पण विराटसाठी एक आनंदाची बातमी ठरली ती म्हणजे, भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याची भेदक गोलंदाजी.

आयसीसी रॅकिंगमध्ये सध्या 25 वर्षीय जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळं त्याच्याकडून विराटला सर्वात जास्त अपेक्षा आहेत. दरम्यान याआधी याच गोलंदाजांवर अनेकांनी त्याच्या अॅक्शनवरुन टीका केली होती. त्याची गती आणि अॅक्शन इतर गोलंदाजांपेक्षा वेगळी असल्यामुळं त्याला सुरुवातीला टीका सहन करावी लागली होती.

6 डिसेंबर 1993मध्ये जन्मलेल्या जसप्रीत बुमराहनं 23 जानेवारी 2016मध्ये आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरोधात त्यानं पहिला एकदिवसीय सामना खेळला. सध्या तो कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉर्ममध्ये भारताकडून खेळतो. बुमराह उजव्या हाताचा गोलंदाज असून, यॉर्कर हे त्याचे मुख्य अस्त्र आहे. त्याच्या यॉर्करपुढे भलेभले फलंदाजही नांगी टाकतात. त्याची गोलंदाजी ही भारतासाठी जमेची बाजू आहे.


इंग्लंडच्या पीचवर बुमराहची कमाल

इंग्लंडचे पीच हे काही अंशी भारतासारखे असले तरी, त्यांचा हवामानात चेंडूला जास्त उसळी मिळते. याचा फायदा बुमराहला होऊ शकतो. त्याच्याकडे गतीही असल्यामुळं त्याच्या चेंडूचा अंदाज फलंदाजांना बांधता येत नाही.

एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड

Loading...

बुमराहनं भारतासाठी एकूण 49 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्यानं 22.15च्या सरासरीनं 85 विकेट घेतल्या आहेत.  27 धावा देत 5 विकेट हा त्याचा बेस्ट परफॉरमन्स राहिला आहे.

बुमराहचे वर्ल्डकपमध्ये पदार्पण

बुमराह पहिल्यांदा भारताकडून वर्ल्डकप खेळत आहे. त्याला याआधी इंग्लंडमध्ये मिनीवर्ल्डकपमध्ये म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. 2017च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बुमराहचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.

असे असतील भारताचे सामने

5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता)

9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता)

13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता)

16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता)

22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता)

27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता)

30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता)

2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता)

6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता)


वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

वाचा-भेलपुरीवाल्याकडून आईला समजला मुलाचा सहा षटकारांचा पराक्रम

वाचा-World Cup : 'भगव्या रंगाची जर्सी, हा तर भाजप लाटेचा परिणाम'

वाचा-World Cup : पाकिस्तानचा कर्णधार विराटसेनेला घाबरला, सामन्याआधीच पराभवाची भीती


उमेदवारी मागे घेण्यासाठी राजू शेट्टींचा प्रकाश आंबेडकरांना 24 वेळा फोन?, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2019 06:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close