IND vs NZ : यॉर्कर किंग बुमराहनं सांगितला भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा फॉर्म्युला

IND vs NZ : यॉर्कर किंग बुमराहनं सांगितला भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा फॉर्म्युला

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बुमराहनं 17 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळं भारताच्या गोलंदाजीची धुरा बुमराहवर असेल.

  • Share this:

मॅंचेस्टर, 08 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी पहिला सेमीफायनल सामना होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळं क्रिकेट चाहते सध्या नाराज आहे. दरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात साखळी फेरीतील सामना पावसामुळं रद्द झाला होता. त्यामुळं न्यूझीलंड आणि भारत यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच भिडणार आहेत.

न्यूझीलंड विरोधात सामना जिंकण्यासाठी भारताला आपली गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली करावी लागणार आहे. याआधी बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली होती. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह यानं चांगली कामगिरी केली होती. दरम्यान भारतासाठी हुकुमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह आपल्या यॉर्करच्या जोरावर भारताला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बुमराहनं 17 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान बुमराहनं आता भारताची सेमीफायनलमधली रणनीती सांगितली आहे. बुमराहनं, "भारतासाठी पाच गोलंदाज हा फॉर्म्युला सगळ्यात योग्य आहे. त्यामुळं सेमीफायनलमध्येही हीच रणनीती असेल", असे सांगितले.

बुमराहनं केले गोलंदाजांचे कौतुक

सेमीफायनलच्या सामन्याआधी बुमराहनं गोलंदाजांचे कौतुक केले. "भारतीय गोलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळं आम्ही खुश आहोत. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळं भारत आतापर्यंत चांगला खेळत आहे", असे कौतुक केले. तसेच जलद गोलंदाजांबद्दल, "हार्दिक पांड्या विकेट घेत आहे. शमी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं कोणत्या एका गोलंदाजावर दबाव नाही आहे. त्यातच आपले फलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत", असे मत व्यक्त केले.

पाच गोलंदाज खेळवण्याचा निर्णय फायद्याचा

श्रीलंकेविरोधात भारतानं पाच गोलंदाजांना खेळवले आहेत. त्यामुळं भारत न्यूझीलंड विरोधात तसाच फॉर्म्युला वापरण्याची शक्यता आहे. दरम्यान या सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी जडेजाला संधी देण्यात आली होती. त्यामुळं श्रीलंकेविरोधातही भारत तोच संघ ठेवणार का?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये बुमराहची चलती

वर्ल्ड कपमध्ये बुमराह सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या यॉर्करनं चांगल्या चांगल्या फलंदाजांची झोप उडवली आहे. अफगाणिस्तानविरोधात बुमराहनं 19 यॉर्कर टाकले होते. आतापर्यंत 8 सामन्यात त्यानं 17विकेट घेतल्या आहेत.

वाचा- WORLD CUP : ...तर सेमीफायनल न खेळताच भारत थेट फायनलमध्ये धडक देणार

वाचा- World Cup: टीम इंडियाकडे शेवटची संधी; 44 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेणार!

वाचा- World Cup मध्ये ICC परंपरा मोडून लॉर्डसवर रचणार इतिहास?

VIDEO : 'माझ्या मुलाला वाचवा', नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण...

First published: July 8, 2019, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading