World Cup : जलद गोलंदाजीचा 'हा' नवा शेहनशाह बदलणार वर्ल्ड कपचं चित्र

World Cup : जलद गोलंदाजीचा 'हा' नवा शेहनशाह बदलणार वर्ल्ड कपचं चित्र

याआधी याच गोलंदाजांवर अनेकांनी त्याच्या अॅक्शनवरुन टीका केली होती.

  • Share this:

लंडन, 04 जून : आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही, त्यामुळं भारताचा पहिला सामना बुधावरी दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहे. या सामन्यात भारताचे पारडे हे दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त जड आहे. कारण दक्षिण आफ्रिकेने याआधी झालेल्या दोन्ही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. तरी विराटच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सज्ज आहे. कारण भारतीय संघ आपल्या विजयासाठी सज्ज आहे.

यंदाच्या विश्वचषकात माजी खेळाडू आणि क्रिकेट जाणकारांनी विराटसेनेला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळं साऱ्यांचेच लक्ष आहे ते, भारतीय संघाच्या खेळीकडे. दरम्यान भारतासाठी गेमचेंजिंग कामगिरी करण्याची क्षमता आहे ती, जसप्रीत बुमराह या गोलंदाजाकडे. आयसीसी रॅकिंगमध्ये सध्या 25 वर्षीय जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळं त्याच्याकडून विराटला सर्वात जास्त अपेक्षा आहेत. दरम्यान याआधी याच गोलंदाजांवर अनेकांनी त्याच्या अॅक्शनवरुन टीका केली होती. त्याची गती आणि अॅक्शन इतर गोलंदाजांपेक्षा वेगळी असल्यामुळं त्याला सुरुवातीला टीका सहन करावी लागली होती.

6 डिसेंबर 1993मध्ये जन्मलेल्या जसप्रीत बुमराहनं 23 जानेवारी 2016मध्ये आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरोधात त्यानं पहिला एकदिवसीय सामना खेळला. सध्या तो कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉर्ममध्ये भारताकडून खेळतो. बुमराह उजव्या हाताचा गोलंदाज असून, यॉर्कर हे त्याचे मुख्य अस्त्र आहे. त्याच्या यॉर्करपुढे भलेभले फलंदाजही नांगी टाकतात. त्याची गोलंदाजी ही भारतासाठी जमेची बाजू आहे.

इंग्लंडच्या पीचवर बुमराहची कमाल

इंग्लंडचे पीच हे काही अंशी भारतासारखे असले तरी, त्यांचा हवामानात चेंडूला जास्त उसळी मिळते. याचा फायदा बुमराहला होऊ शकतो. त्याच्याकडे गतीही असल्यामुळं त्याच्या चेंडूचा अंदाज फलंदाजांना बांधता येत नाही.

एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड

बुमराहनं भारतासाठी एकूण 49 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्यानं 22.15च्या सरासरीनं 85 विकेट घेतल्या आहेत. 27 धावा देत 5 विकेट हा त्याचा बेस्ट परफॉरमन्स राहिला आहे.

डेथ ओव्हरचा बादशाह

आपल्या यॉर्करच्या जोरावर 25 वर्षीय बुमराहनं डेथ ओव्हर्समध्ये दमदार कामगिरी केली आहे. आपल्या पदार्पणानंतर बुमराहनं आतापर्यंत खेळलेल्या 41 ते 50 ओव्हरमध्ये 291 चेंडू टाकले आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे, डेथ ओव्हरमध्ये त्यानं 45 विकेट घेतले आहेत. तर, ट्रेंट बोल्टनं डेथ ओव्हरमध्ये 218 चेंडूत 33 विकेट घेतल्या आहेत.

बुमराहचे वर्ल्डकपमध्ये पदार्पण

बुमराह पहिल्यांदा भारताकडून वर्ल्डकप खेळत आहे. त्याला याआधी इंग्लंडमध्ये मिनीवर्ल्डकपमध्ये म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. 2017च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बुमराहचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.

वाचा-World Cup : विराटपुढे धर्मसंकट ! कोणत्या 11 खेळाडूंना मिळणार दक्षिण आफ्रिकेविरोधात संधी

वाचा-World Cup : विराटसेनेची कमाल! एकही सामना न खेळता पोहचला 7व्या क्रमांकावर, 'हे' आहे कारण

वाचा- भारतीय क्रिकेटपटूची डोपिंग चाचणी, वर्ल्ड कपमधला 'असा' एकमेव खेळाडू

CET परीक्षेचा आज निकाल, यासोबतच इतर महत्त्वाचा 18 घडामोडी

First published: June 4, 2019, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading