World Cup : एकीकडे रोमांचक भारत-पाक सामना दुसरीकडे कपलचा रोमान्स, VIDEO VIRAL

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना दरम्यान भारतीय जोडप्यांच्या रोमान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 06:50 PM IST

World Cup : एकीकडे रोमांचक भारत-पाक सामना दुसरीकडे कपलचा रोमान्स, VIDEO VIRAL

लंडन, 24 जून : ICC Cricket World Cup मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 16 जूनला झाला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशातील सामना म्हणजे मैदानावरचं युद्ध असतं. मँचेस्टरवर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 89 धावांनी पराभूत केलं. पावसामुळे पाकिस्तानला सुधारित आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, त्या आव्हानाच पाठलागही पाकच्या खेळाडूंना करता आला नाही. क्रिकेट चाहत्यांना ज्या अटीतटीच्या सामन्याची गरज होती तसा हा सामना झाला नाही. मात्र, या सामन्यात सर्वांची मनं जिंकली ती, एका भन्नाट कपलनं.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळं दोनवेळा थांबवला गेला. त्यामुळं चाहते निराश झाले होते. मात्र, यातही एका जोडप्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे जोडपं चक्क रोमान्स करताना दिसत आहे. हे दोन्ही चाहते भारतीय होते, टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ते मैदानावर हजर होते. मात्र, यावेळी भारत-पाक सामना रोमांचक झाला असतानाच, त्यांच्या रोमान्सवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

पाकिस्तानचा संघ फलंदाजी करत असताना मुलानं भर मैदानात आपल्या प्रेयसीला प्रपोज केले. यावेळी त्या मुलीला काहीच कल्पना नव्हती, मात्र इतर प्रेक्षकांनी या दोघांकरिता टाळ्या वाजवल्या.

पाकचा कमबॅक

Loading...

पाकिस्तानने भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत जोरदार कमबॅक केलं आहे. लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानना 50 षटकांत 308 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 259 धावांत रोखलं. या विजयानंतर पाकिस्तानच्या सेमीफायनलला पोहचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाकिस्तानच्या विजयाने यजमान इंग्लंडच्या पुढच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

वाचा- आता जगाला मिळाला दुसरा धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा

वाचा- World Cup : कोण आहे ही हॉट अ‍ॅंकर, सचिनसोबतचा सेल्फी झाला VIRAL

वाचा-ऑन फिल्ड हिटमॅन तर ऑफ फिल्ड दम्शराज किंग, VIDEO VIRAL

' पिवळी साडीवाली' अधिकारी महिलेच्या डान्सचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...