मॅंचेस्टर, 11 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये न्यूझीलंडकडून पराभव होताच भारतीय क्रिकेट संघात राजीनामा सत्र सुरु झाले आहे. न्यूझीलंडनं भारताला 18 धावांनी पराभूत केले, यात सलामाचे आणि आघाडीचे फलंदाज अयशस्वी ठरले. दरम्यान भारताचे आव्हान संपुष्टात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी दोघांनी राजीनामा दिले आहेत. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये असलेल्या दोघांनी राजीनामे दिले आहेत. यात संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट आणि फिटनेस कोच शंकर बासू यांचा सामेवश आहे.
भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या दोन व्यक्तींची सेवा यापुढे मिळणार नाही. भारतीय संघ मैदानात जरी 11 खेळाडूंचा असला तरी त्यामागे मेहनत घेणारे अनेक जण असतात. खेळाडूचे फिटनेस हा मैदानातील कामगिरीसाठीचा महत्त्वाचा भाग असतो. भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान सेमीफायनलमध्ये संपल्यानंतर फरहार्ट आणि बासू यांनी राजीनामे दिले आहेत.
फरहार्ट यांचा करार वर्ल्ड कपपर्यंतच होता. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने या दोघांना करार पुन्हा वाढवून दिला होता. पण दोघांनीही तो वाढवून घेण्यास नकार दिला. भारतीय संघासोबतचा माझा आज शेवटचा दिवस होता. मला जशी कामगिरी हवी होती तशी कामगिरी करू शकलो नाही. भारतीय संघासोबत गेली 4 वर्ष काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो. भारतीय संघाला आणि त्याच्या सपोर्ट स्टाफला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे फरहार्ट यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
विराट कोहलीचे भावनिक ट्विट मानले आभार
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं फरहार्ट आणि बासू यांचे आभार मानले आहे. कोहलीनं, "फरहार्ट आणि बासु तुम्ही संघासाठी जे काम केले आहे, ते कमाल आहे. मुख्य म्हणजे आपली मैत्री खुप खास आहे. तुम्ही दोघंही खुप चांगले आहेत. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा", असे ट्विट केले आहे.
Thank you Patrick and Basu for the amazing work you both have done for the team. More importantly, the friendship you have with all of us is even more special. You both are true gentlemen. Wish you the best for everything else in life ahead. 🙏🙂 @patrickfarhart
— Virat Kohli (@imVkohli) July 11, 2019
कोहलीच्या फिटनेसमागे होता हा चेहरा
कर्णधार विराट कोहलीने त्याच्या फिटनेसचे श्रेय बासू यांनाच दिले होते. राजीनामा देणाऱ्या बासू यांनी भारतीय क्रिकेटपटूंसाठी यो-यो टेस्ट पास करणे बंधनकारक केले होते. अर्थात बासू यांचे काम हे पडद्यामागचे होते. बासू हे आयपीएलमधील विराट नेतृत्व करत असलेल्या बंगळुरू संघाचा भाग आहेत.
VIDEO : धोनीचा फोटो काढताना फोटोग्राफरलाही रडू कोसळलं
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा