IND vs BAN : भारताच्या फिरकीपुढं बांगलादेश गार, 95 धावांनी विराटसेनेनं मिळवला विजय

IND vs BAN : भारताच्या फिरकीपुढं बांगलादेश गार, 95 धावांनी विराटसेनेनं मिळवला विजय

धोनी आणि केएल यांनी 104 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर भारतानं बांगलादेशसमोर मोठे आव्हान ठेवले.

  • Share this:

लंडन, 28 मे : न्युझीलंड विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर विराटसेनेनं दुसऱ्या सामन्यात 95 धावांनी बांगलादेशला पराभूत केले. भारतानं दिलेले 360 धावांचे आव्हान बांगलादेशला पार करता आले नाही. भारताच्या फिरकीपटूंनी 264 धावांतच त्यांना गार केले. भारतासाठी युजवेंद्र चहलनं आणि कुलदीप यादवं 3 विकेट घेतल्या. तर, जसप्रीत बुमराहनं किफायतशीर गोलंदाजी केली.

प्रथम फलंदाजी करताना, केएल राहुल आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं आकडा 359गाठला. बांगलादेशनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज फेल झाल्यानंतर विराटनं 47 धावांची खेळी केली. सलामीला आलेल्या धवन आणि रोहित यांनी केवळ 5 धावा केल्या. त्यामुळं भारताच्या सलामीची चिंता पुन्हा एकदा समोर आली आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या राहुलनं सुरुवातील आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. धोनी आणि राहुलच्या या खेळीच्या जोरावर भारतानं बांगलादेशला 360 धावांचे आव्हान दिले.

केएल राहुलनं धोनीसोबत राहुलनं शतकी भागीदारी केली. राहुलनं 94 चेंडूत आपलं शतक पुर्ण केले तर, धोनीनं केवळ 73 चेंडूत आपले शतक पुर्ण केले. केएल राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पांड्यानं 11 चेंडूत 21 धावा केल्या.2 चौकार आणि 1 षटकार खेचत तो झटपट बाद झाला. धोनी 113 धावा करत बाद झाला. बांगलादेशकडून रुबेलनं 2 विकेट घेतल्या.

विश्वचषकासाठी केवळ 2 दिवस उरले असताना, सराव सामन्यांमध्ये आपल्या कमकुवत बाजू सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विराटला आपल्या चौथ्या क्रमांकाचा दावेदार सापडला असल्याचे चित्र आता दिसत आहे. न्युझीलंड विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपली नांगी टाकली, त्यामुळं हा सामना भारताला गमवावा लागला. अशीच काहीशी परिस्थिती बांगलादेश विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यातही पाहायला मिळाली. 84 धावात 4 विकेट गेल्या असताना, चौथ्या क्रमांकावर आलेल्या केएल राहुलनं आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्यानं 48 चेंडूत आपले अर्धशतक आणि धोनीच्या मदतीनं 94 चेंडूत आपले शतक पुर्ण केले. तर, धोनीनंही आपले अर्धशतक पुर्ण केले. याआधी विराटनं 47 धावांची खेळी केली होती.

मधल्या फळीची चिंता विराटला सतावत असताना, आता त्याच्यासाठी केएल राहुल धावून आला. केएल राहुलनं धोनीसोबत 104 धावांची भागीदारी केली आणि भारताला चांगल्या स्थितीत पोहचवले.

विजय शंकर आणि केदार जाधव हे दोन्ही भारताचे युवा फलंदाज चौथ्या क्रमांकाचे प्रबळ दावेदार असले तरी, न्युझीलंड विरोधात या दोघांनाही संघात स्थान मिळाले नाही. कारण दोन्ही फलंदाज दुखापतग्रस्त असल्यामुळं त्यांना संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळं भारतीय संघ 179 धावांतच गारद झाला. दरम्यान बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात तंदुरुस्त झालेल्या विजय शंकरला जागा देण्यात आली आहे. मात्र, केदार जाधवला संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळं केदार जाधवची दुखापत भारतासाठी चिंतेचा विषय ठरु शकते. त्यामुळं केएल राहुल याच्या शतकी खेळीच्या जोरावर त्यानं जवळजवळ आपले संघातील स्थान पक्के केले आहे.

धोनीचा फॉर्म महत्त्वाचा

भारतीय संघासाठी धोनी किती महत्त्वाचा आहे, हे वेगळे सांगायला नको. ही गोष्ट रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी सुध्दा मान्य केली. दरम्यान पहिल्या सराव सामन्यातही हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांच्यासोबत धोनीनं चांगली फलंदाजी केली होती. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही धोनीनं आपले अर्धशतक पुर्ण करत, कमाल शॉटही लगावले.

सलामीचे फलंदाज मात्र फेल

न्युझीलंड विरोधात झालेल्या सामन्यात स्वींग गोलंदाजांसमोर फलंदाजांनी नांगी टाकली. यात सलामीचे फलंदाज सपशेल फेल ठरले. दरम्यान शेवटच्या सराव सामन्यातही धवन आणि रोहित शर्मा यांना चांगली फलंदाजी करता आली नाही. शिखर धवन केवळ 1 धावांवर बाद झाला तर, रोहित शर्मा 19 धावा करत बाद झाला. दोघांमध्ये केवळ 5 धावांची भागीदारी झाली. त्यामुळं विराटच्या चिंता वाढणार आहेत.

वाचा- World Cup : काय चालयं काय, वर्ल्डकपसाठी निवड पण 'या' पुणेकराचे संघात स्थान निश्चित नाही

वाचा- IND vs BAN : भारताची फलंदाजी विराटसाठी डोकेदुखी, मुख्य सामन्यांआधी संघात होणार बदल ?

वाचा- नो बॉल बुमराहचा अन् स्टार झाला पाकिस्तानी फलंदाज

VIDEO: 30 सेकंद उडणारं 3 ग्रॅम वजनाचं विमान तुम्ही पाहिलं आहे का?

First published: May 28, 2019, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading