World Cup : ‘विराटसेनेला हरवण्याचा दम पाकिस्तानच्या संघात नाही’

World Cup : ‘विराटसेनेला हरवण्याचा दम पाकिस्तानच्या संघात नाही’

मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा विश्वचषकात टशन झाले आहे. मात्र एकाही सामन्यात पाकिस्तानला भारताला नमवण्यात यश आलेले नाही.

  • Share this:

लंडन, 04 जून : आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही, त्यामुळं भारताचा पहिला सामना बुधावरी दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहे. या सामन्यात भारताचे पारडे हे दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त जड आहे. कारण दक्षिण आफ्रिकेने याआधी झालेल्या दोन्ही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. तरी विराटच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सज्ज आहे. कारण भारतीय संघ आपल्या विजयासाठी सज्ज आहे.

यंदाच्या विश्वचषकात माजी खेळाडू आणि क्रिकेट जाणकारांनी विराटसेनेला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळं साऱ्यांचेच लक्ष आहे ते, भारतीय संघाच्या खेळीकडे. दरम्यान वर्ल्ड कपमधला सर्वात मोठा आणि हायवोल्टेज असणार आहे तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. आयसीसी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्विकारला होता. मात्र इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दमदार कमबॅक करत त्यांनी हा सामना जिंकला. त्यामुळं पाकिस्तान संघाकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, पाकिस्तान भारताला कधीच हरवू शकत नाही. कारण पाकिस्तान संघात दम नाही आहे, भारताला नमवण्याचा असा विश्वास, भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने व्यक्त केला आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत हरभजन सिंग याने विश्वचषक स्पर्धेच्या आपल्या आठवणी सांगितल्या. तसेच भारतीय संघाचा पाकिस्तानशी होणारा सामना याबाबतही एक विधान केले आहे. वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला पराभूत करण्याचा दम पाकिस्तानच्या संघामध्ये नाही. भारताला धूळ चारण्याची संधी पाकिस्तानच्या संघाला नक्कीच नाही”, असे मत हरभजननं व्यक्त केले. सध्याचा पाकिस्तानच्या संघात चांगले खेळाडू आहेत. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा विश्वचषकात टशन झाले आहे. मात्र एकाही सामन्यात पाकिस्तानला भारताला नमवण्यात यश आलेले नाही. त्यामुळं 16 तारखेला होणाऱ्या सामन्यातही भारत पाकिस्तानवर विजय मिळवेल.

वाचा-World Cup : विराटपुढे धर्मसंकट ! कोणत्या 11 खेळाडूंना मिळणार दक्षिण आफ्रिकेविरोधात संधी

वाचा-World Cup : विराटसेनेची कमाल! एकही सामना न खेळता पोहचला 7व्या क्रमांकावर, 'हे' आहे कारण

वाचा- भारतीय क्रिकेटपटूची डोपिंग चाचणी, वर्ल्ड कपमधला 'असा' एकमेव खेळाडू

CET परीक्षेचा आज निकाल, यासोबतच इतर महत्त्वाचा 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 02:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading